कुंभी कारखाना निवडणुकीसाठी रविवार १२ रोजी मतदान , | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभी कारखाना निवडणुकीसाठी रविवार १२ रोजी मतदान ,
कुंभी कारखाना निवडणुकीसाठी रविवार १२ रोजी मतदान ,

कुंभी कारखाना निवडणुकीसाठी रविवार १२ रोजी मतदान ,

sakal_logo
By

फोटो आहे..
...


कुंभी कारखान्यासाठी आज मतदान

मतदानासाठी १०५ केंद्रे : मंगळवारी मतमोजणी

कुडित्रे, ता.११ ः कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दुरंगी लढत होत आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, उद्या रविवारी (ता.१२) मतदान होत आहे. १०५ केंद्रांवर मतदान होणार असून, ८४० कर्मचारी काम पाहणार आहेत, तर मंगळवारी (ता. १४) मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
२३ जागांसाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी नरके पॅनेलमधून २३ उमेदवार, तर विरोधी राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलमधून ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेली पंधरा दिवस कार्यक्षेत्रात प्रचाराचा धुरळा उडाला होता. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये २२,३८५ सभासद संख्या होती, यावेळी ती वाढून २३,४३१ झाली आहे.

गट क्रमांक एकमध्ये कुडित्रे, वाकरे, कोपार्डे, कळंबे, भामटे, चिंचवडे येथे मतदान होणार असून, या गटात ३२१० मतदान आहे. गट क्रमांक दोनमध्ये सांगरूळ, म्हारुळ, आमशी, खाटांगळे, पासार्डे, कसबा बीड, गणेशवाडी, सावरवाडी, बहिरेश्वर, शिरोली दुमाला, सडोली दुमाला, सावर्डे, चाफोडी, आरळे, घाणवडे, महे येथे मतदान होणार असून, या गटात सर्वात जास्त ६८८९ मतदार संख्या आहे. गट क्रमांक तीनमध्ये कोगे, खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी, वरणगे, पाडळी बु ,दोनवडे, शिंगणापूर, पाडळी खुर्द येथे मतदान होणार असून, ३८९२ मतदान आहे. गट क्रमांक चारमध्ये यवलूज, माजगाव, आळवे, पुनाळ, काटेभोगाव, कसबा ठाणे, दिगवडे, तिरपण, कोलोली, नणंद्रे, पोहाळे, वाळोली येथे मतदान होणार असून, ३९७२ मतदान आहे. गट क्रमांक पाचमध्ये बोरगाव, चव्हाणवाडी, बाजार भोगाव, किसरूळ, पाटपन्हाळा, पोर्ले, देसाईवाडी, माळापुडे, पाली, कसबा कळे, घरपण, निवडे, मांडुकली, सावर्डे, असंडोली, पनोरे, आकुर्डे, पनुत्रे, म्हासुर्ली इथे मतदान होणार असून ५१०० मतदान आहे. ब वर्ग संस्था ३६८ मतदारसंख्या असून, कुडित्रे कारखाना साईट, स. ब. खाडे महाविद्यालय येथे मतदान होणार आहे.
....

३५ टेबलवर मतमोजणी

मंगळवारी (ता.१४) रमणमळा येथे ३५ टेबलवर मतमोजणी होणार आहे. पहिला निकाल दुपारी चार वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. करवीर तालुक्यात सुमारे १४ हजार मतदार संख्या आहे, तर पन्हाळा (८ हजार), गगनबावडा (७००), राधानगरी (५००), शाहूवाडी (६००) अशी मतदार संख्या आहे.