
कुंभी कासारी बँकेची निवडणूक बिनविरोध
03605
अजित नरके
कुंभी कासारी बँकेची
निवडणूक बिनविरोध
कुडित्रे, ता. २९ : कुंभी कासारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक माजी आमदार चंद्रदीप नरके आणि कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे यांनी काम पाहिले.
जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या कुंभी बँकेची २१ जागांसाठी निवडणूक लागली. ७२ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ३८ अर्ज पात्र झाले. २६ मे रोजी माघारीचा अंतिम दिवस होता. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा उमेदवारांनी माघारी घेतली. यामुळे २० जागांची निवडणूक बिनविरोध झाली. भटक्या विमुक्त जातीचा उमेदवार अपात्र झाला आहे. यामुळे एक जागा रिक्त राहिली. या वेळी माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, ‘‘स्वर्गीय डी. सी. नरके यांनी कुंभी भागात शेतकऱ्यांना पत पुरवठा व्हावा यासाठी कुंभी बँकेची स्थापना केली. बँकेचा आता वटवृक्ष झाला आहे. २०० कोटीचे उद्दिष्ट नूतन संचालकांना दिले. अजित नरके म्हणाले, ‘‘स्वर्गीय डी.सी. नरके यांच्या आशीर्वादाने चंद्रदीप नरके यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध झाली. दहा नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे.’’
बिनविरोध झालेले संचालक असे, सर्वसाधारण प्रतिनिधी - अरुण पाटील - कुडित्रे, आनंदा पाटील - सुळे, मारुती चौगले - खेरीवडे, रंगराव पाटील - कोलोली, सदाशिव चौगले - वाकरे, बाबुराव पाटील - पाडळी खुर्द, प्रकाश देसाई - चिंचवडे, अजित नरके - बोरगाव, पंडित वरुटे - कसबा बीड, दत्तात्रय पाटील - यवलुज, प्रकाश काटकर - पाटपन्हाळा, हिंदुराव मगदूम - पुनाळ, रणजीत पाटील - कोगे, प्रदीप नाळे - सांगरुळ, कृष्णात वरुटे - बहिरेश्वर, कृष्णा पाटील - खुपिरे. महिला राखीव - ललिता सदाशिव बाटे - स्वयंभूवाडी, रेखा सुरेश पाटील - पोहाळे. अनुसूचित जाती - दत्तात्रय कांबळे - हिरवडे. इतर मागास - आनंदराव माने - माजगाव.