
शेतकऱ्याचा मृत्यू
03621
...
तणनाशक फवारताना विषबाधा,
खाटांगळे येथील शेतकऱ्याचा मृत्यू
सांगरूळः खाटांगळे (ता.करवीर) येथे शेतामध्ये तणनाशक फवारत असताना तोंडावर औषध उडाल्याने विषबाधा होऊन शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शिवाजी दत्तू पाटील (वय ६७) असे त्यांचे नाव आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शिवाजी पाटील हे मंगळवारी (ता.३०) सायंकाळी शेतामध्ये तणनाशक फवारणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, वादळ व विजांच्या कडकडाट आणि पाऊस सुरू झाल्याने गडबडीत औषधाचा फवारा तोंडावर उडल्याने नाकातोंडात औषध गेल्याने त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. तेथे ते कोमात गेल्याने त्यांना कोल्हापूरमधील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले . उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे.