सांगरूळ मध्ये धरण ते स्मशानभूमी   रस्त्याच्या दोन्ही बाजूला सौर दिवे

सांगरूळ मध्ये धरण ते स्मशानभूमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला सौर दिवे

Published on

सांगरूळमध्ये सौरदिवे लावण्याचे
काम सुरू ः सुभाष सुतार
सांगरूळ, ता. १८ ः सांगरूळ ग्रामपंचायतीतर्फे १५ व्या वित्त आयोगातून सांगरूळ धरण ते स्मशानभूमीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सौरदिवे लावण्याचे काम सुरू करण्यात आले. गावाबाहेरील रस्त्याच्या दुतर्फा सौरदिवे लागणारे सांगरूळ हे तालुक्यातील पहिले गाव असल्याची माहिती उपसरपंच सुभाष सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी सुतार म्हणाले, की सांगरूळ धरण ते स्मशानभूमीपर्यंतच्या अडीच किलोमीटरच्या रस्त्यावरून पहाटे पाचपासून नागरिकांची मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉकसह शेतीच्या कामासाठी ये-जा असते. सुरक्षितता म्हणून ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून १० सौरदिवे, अडीच किलोमीटरमध्ये ठिकठिकाणी लावण्याचा निर्णय घेतला. या कामाचा प्रारंभ ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या हस्ते झाला.
ग्रामपंचायतीच्या पाच टक्के निधीतून गावातील ५० दिव्यांगांना दीड लाखाच्या मदतीचे वाटप करण्यात आले. या वेळी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, सरपंच शीतल खाडे, तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक बाळासो यादव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णात खाडे, ‘कुंभी’चे माजी संचालक भरत खाडे, पांडुरंग विकास सोसायटीचे अध्यक्ष सतीश तोरस्कर, दीपक घोलपे, ग्रामविकास अधिकारी अमोल काजवे, ग्रामपंचायत सदस्य रवी खाडे, गजानन शिवदे, बाळासो खाडे, सचिन नाळे, बदाम खाडे, सागर खाडे, संभाजी आंबी, दीपक म्हेत्तर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.