खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट, शेतकऱ्यांच्यात चिंता वाढली

खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट, शेतकऱ्यांच्यात चिंता वाढली

Published on

जिल्ह्याच्या पूर्व भागात
मशागतीच अपूर्ण
खरिपावर टंचाईचे मोठे सावट

कुडित्रे, ता.११ ः पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात खरीप हंगामावर टंचाईचे मोठे सावट आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ७० हजार ७३८ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. या क्षेत्राला उघडिपीचा मोठा फटका बसणार आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातील तालुक्यात अद्याप खरिपाच्या पेरण्या नाहीत. पाऊस नसल्याने मशागतीचीही कामे अनेक ठिकाणी पूर्ण झालेली नाहीत.
जिल्ह्याचे खरीप हंगामचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९२,६३३ हेक्टर इतके आहे. आतापर्यंत ७० हजार ७३८ हेक्टर (३६.२२ टक्के) क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. यामध्ये भात, खरीप ज्वारी, भुईमूग, नागली, सोयाबीनचा समावेश आहे. जिल्ह्यात वातावरण अंशतः ढगाळ आहे. राधानगरीसारख्या पर्जन्य प्रमाण अधिक असलेल्या भागातही काही काळासाठी कडकडीत उन पडत आहे. या परिस्थितीमुळे एकूण शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय संकटात आले आहेत. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १९७१.६ मिलिमीटर आहे. जुलै २०२३ चे सरासरी पर्जन्यमान ६८५.५ मिलिमीटर इतके असून, ५ जुलै २०२३ अखेर ७.५ मिलिमीटर (१९.९ टक्के) इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. म्हणजे अपेक्षाइतपतही पाऊस झालेला नाही.
२५ जूनपासून पावसास सुरवात झालेली होती. पाऊस सुरू होण्यास विलंब झाल्यामुळे पेरण्यांना उशीर झाला. चांगला पाऊस झालेल्या ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या आहेत; मात्र आज सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस गायब होता. काही तालुक्यांत अल्प प्रमाणात पाऊस झाला. परिणामी तेथे पेरण्या व भात रोप लागणी खोळंबली आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामात सात जुलैअखेर १५८.८ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे एक लाख २६ हजार २८ हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. त्यामध्ये भात हेक्टर, नागली २५७१ हेक्टर, भुईमूग २६२४. ९ हेक्टर, तर सोयाबीन ३२ हजार ४३० हेक्टर, तर ९१९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची पेरणी झालेली होती. भात पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ९२३२० हेक्टर इतके आहे.
चालू हंगामात भात ३७ हजार ५०० हेक्टर (४०.६२ टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. भात रोपलावणीसाठी ४५०० हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्यात आलेल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने रोपलावणीची कामे खोळंबली आहेत. चांगला पाऊस झाल्यास रोपलावणीस वेग येणार आहे. पेरणी झालेल्या भात पिकाची उगवण चांगली झाली आहे. नाचणी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १७ हजार १०० हेक्टर इतके क्षेत्र आहे. पैकी फक्त ८३६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून, रोपलावणीसाठी रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत.

आडसाली हंगाम १०० हेक्टर क्षेत्रावर लावण झालेली आहे. एप्रिल, मे व जूनमध्ये भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने विहिरीच्या पाण्यावर अवलंबून क्षेत्रामधील उस पिकाच्या वाढीवर परिणाम दिसून येत आहे. उसाला जीवदान मिळण्यासाठी दमदार पावसाची अत्यंत आवश्यकता आहे.
- दत्तात्रय दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.