आमदार पी एन. पाटील यांचा वाढदिवस शुभेच्छांच्या वर्षावात साजरा

आमदार पी एन. पाटील यांचा वाढदिवस शुभेच्छांच्या वर्षावात साजरा

कोल्हापूर ः आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन करताना मान्यवर.
...

आमदार पी. एन. पाटील यांचा
वाढदिवस शुभेच्छांच्या वर्षावात


कुडित्रे, ता. ६ : काँग्रेसचे नेते आमदार पी. एन. पाटील (सडोलीकर) यांचा वाढदिवस उत्साहात झाला. जिल्ह्याच्या विविध भागातील कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यासह, राज्यातील राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, आमदार पाटील यांना प्रत्यक्ष भेटून व फोनवरून शुभेच्छा दिल्या.
कोल्हापुरातील राजारामपुरी येथील भारत हाउसिंग सोसायटीच्या कार्यालयामध्ये सकाळी दहापासूनच आमदार पाटील यांच्या अभीष्टचिंतनासाठी नेते, कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. आमदार पाटील यांना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, एच. के. पाटील, दिग्विजय सिंह, डॉ. डी. वाय. पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माणिकराव ठाकरे, आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार वर्षा गायकवाड, आमदार यशोमती ठाकूर, आमदार अरुण लाड, आमदार वैभव नाईक, आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, उल्हासदादा पवार, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, आमदार राजेश पाटील, भरमू आण्णा पाटील, पृथ्वीराज पाटील, खासदार धनंजय महाडिक, जयवंतराव आवळे, निवेदिता माने, के. पी. पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील, काकासाहेब पाटील (निपाणी), मालोजीराजे छत्रपती यांनी फोनवरून शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.
संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजू आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर,मधुरिमाराजे छत्रपती, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे व संचालक मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, व्ही. बी. पाटील, समरजितसिंह घाटगे, शेकाप पक्षाचे क्रांतिसिंह पवार- पाटील, अक्षय पवार- पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे, सर्व संचालक, विश्वराज महाडिक, सत्यजित कदम, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, पी जी शिंदे, ॲड. शिवाजीराव राणे व ॲड. सुरेश कांबळे यांच्यासह मान्यवरांनी आमदार पाटील यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.श्रीपतरावदादा सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com