पावसाचे पाणी नव्हे हे वाहतय गटर्स

पावसाचे पाणी नव्हे हे वाहतय गटर्स

04978

दोनवडेत गटारीअभावी सांडपाणी रस्त्यावर

कोल्हापूर गगनबावडा रस्ता रुंदीकरण ः पावसाळ्यात होणार त्रास

कुडित्रे, ता. १० : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. येथे अनेक ठिकाणी गटारी व नाले केले नसल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. दोनवडेत रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. नागरी वस्ती असलेल्या ठिकाणी गटर करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
कोल्हापूर रस्त्याचे पहिल्या टप्प्यात फुलेवाडी-कळे रुंदीकरण सुरू आहे. बहुतांश काम पूर्ण होत आले असून दोनवडेत पुलाचे काम व एक किलोमीटर रस्ता रुंदीकरणाचे काम झालेले नाही. गगनबावडा मार्गावर कोल्हापूर ते गगनबावडा ६० किलोमीटर अंतरावर फक्त चार किलोमीटर गटर्स होतील. या मार्गावर घाटमाथ्यावर व परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असते. यामुळे ठिकठिकाणी उतारावर पावसाचे पाणी थेट वस्तीत घुसत आहे. ठिकठिकाणी रस्त्याची उंची तीन फूट ते सहा फूट वाढली आहे. बालिंगा, कोपर्डे, कळे येथे फक्त गटर केल्या जाणार आहेत. याव्यतिरिक्त दोनवडे, वाकरे, कळंबे, आडूर अशी अनेक गावे रस्त्यालगत आहेत. येथे वस्तीही वाढत आहे; मात्र गटर केले नसल्यामुळे पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. दोनवडेत गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. गटारीबाबत राज्य महामार्ग खात्याला निवेदन दिले. मात्र काही ठिकाणचे गटार सेविंग झाल्यानंतर करू, असे सांगितले होते. पावसाळ्यापूर्वी वस्तीच्या ठिकाणी गटर करावे, नाले काढावे, अशी मागणी होत आहे.

पॉइंटर
गरजेच्या ठिकाणी गटर करावेत
दुभाजकाअभावी अपघात मालिका
गावाच्या ठिकाणी पांढरे पट्टे, सिग्नल बल्ब हवेत
वाहने, हॉटेलचे बोर्डद्वारे अतिक्रमण सुरू

कोट
वस्तीच्या ठिकाणी गटर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. यावेळी सेविंग करून गटर्स करू, असे आश्वासन मिळाले. संबंधित खात्याने जादा निधी लावून मागणी असेल तेथे गटर करावेत; अन्यथा पावसाच्या पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागेल.
- सर्जेराव शिंदे, सरपंच, दोनवडे,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com