आमशीच्या तरुणाची विष पिऊन आत्महत्या

आमशीच्या तरुणाची विष पिऊन आत्महत्या

04997
राम पाटील
..........
आमशीच्या तरुणाची विष पिऊन आत्महत्या

कोल्हापूर ः आमशी (ता. करवीर) येथील तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली. राम अशोक पाटील (वय २७) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे. याबाबत माहिती अशी ः राम पाटील हा महावितरण कंपनीमध्ये नोकरीस होता. भामटे (ता. करवीर) येथील सबस्टेशनमध्ये तो ऑपरेटर म्हणून काम करत होता. आज नेहमीप्रमाणे तो कामावर गेला. साडेदहाच्या दरम्यान त्याने तेथे विषारी औषध प्राशन केले व मोबाईलवरून गावातील एका मित्राला फोन करून आपण विष प्यायल्याचे सांगितले आणि फोन बंद केला. नागरिकांनी तातडीने त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा रात्री आठच्या सुमारास मृत्यू झाला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी रामच्या वडिलांचे निधन झाले असून, तो अविवाहित होता. त्याच्या मागे आई व बहीण असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com