आमदार पी एन पाटील अनंतात विलीन   ,सडोली खालसा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आमदार पी एन पाटील अनंतात विलीन ,सडोली खालसा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

वर आठ कॉलम पट्टी करणे
03397, 03396 ( अडीच कॉलम), 03399 ( हा फोटो तीन कॉलम वापरावा)

खालील फोटो पोटात वापरणे
05050
सडोली खालसा ः येथे आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली वाहताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, अरुण डोंगळे, विश्वास पाटील, राजेश पाटील.

05049
महिलांना अनावर झाले दुःख.

हजारोंच्या उपस्थितीत पी. एन. पाटील यांना अखेरचा निरोप
सडोली खालसा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ः राज्यातील नेते, कार्यकर्त्यांची उपस्थिती

कुडित्रे , ता.२३ : करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. सडोली खालसा (ता. करवीर) येथे त्यांच्या मूळ गावी अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘पी. एन. पाटील अमर रहे ! अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. गावातील शिवाजी महाराज पटांगणावर दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. यावेळी राज्यातील व जिल्ह्यातील नेत्यांनी पार्थिवाचे दर्शन घेतले. आज आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांचा जनसागर लोटला होता. दरम्यान, मुलगा राहुल पाटील, राजेश पाटील यांनी पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी कुटुंबातील मुलगी टिना पाटील, जावई महेश पाटील, रवी पाटील, बाजीराव खाडे, उदय पाटील उपस्थित होते.

राज्य शासनाच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महिंद्र पंडित यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, समरजितसिंह घाटगे, संजय घाटगे, बाळासाहेब खाडे, शिवाजी कवठेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकीयन, महापालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी, तहसीलदार स्वप्नील रावडे आदी उपस्थित होते.
आज सकाळी आमदार पी. एन. पाटील यांचे पार्थिव हॉस्पिटलमधून राजारामपुरी येथील निवासस्थानी आणले. तेथून पुढे जिल्हा काँग्रेस कमिटी भवन येथे काही वेळ पार्थिव दर्शनासाठी ठेवले. यानंतर दुपारी बारा वाजता फुलेवाडी येथील त्यांच्या गॅरेजवरील कार्यालयावर पार्थिव दर्शनासाठी आणण्यात आले. यावेळी हजारो कार्यकर्ते शोकमग्न अवस्थेत उपस्थित होते. यानंतर वाशीमार्गे पार्थिव सडोलीकडे निघाले. यावेळी मार्गावर नागरिक, कार्यकर्ते, महिलांनी रस्त्याच्या दुतर्फा उभारून रग्णवाहिकेवर पुष्पवर्षाव केला. काही ठिकाणी रुग्णवाहिका थांबवून भावपूर्ण वातावरणात नेत्याचे अखेरचे दर्शन घेतले.
यानंतर सडोली खालसा या त्यांच्या मूळ जन्मस्थानी घरी पार्थिव दर्शनासाठी आणले. तेथे नातेवाईक व महिलांनी हंबरडा फोडला. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सर्व नातेवाइकांनी अंत्यदर्शन घेतले.
दरम्यान, नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी फुलांनी सजवलेल्या वाहनात त्यांचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रा निघाली. गावातून फेरी काढत छत्रपती शिवाजी महाराज पटांगणावर विधीसाठी आणण्यात आले. यावेळी श्रद्धांजली वाहताना अनेक नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार जयश्री जाधव, आमदार धीरज देशमुख, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी मंत्री भरमू पाटील, बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे विजय देवणे, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, कराडचे आमदार आनंदराव पाटील, सांगलीचे विशाल पाटील, प्रा.जालिंदर पाटील, वसंत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. माजी मंत्री बाळासाहेव शिवरकर, आमदार उल्हासराव पवार, गोकुळ संचालक विश्वास पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, कृष्णराज महाडिक, पृथ्वीराज महाडिक, देवराज नरके, उत्तम कांबळे, संताजी घोरपडे, हर्षल सुर्वे, आबा कांबळे, सदाशिव चरापले, धर्यशील देसाई, राहुल देसाई, राहुल माने, उदयसिंह पाटील-कौलवकर, राजू लाटकर, डॉ. के. एन. पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, चेतन नरके, बाबासो देवकर, केरबा पाटील, जनता दलाचे वसंतराव पाटील, अभिजित तायशेटे, भोगावतीचे अध्यक्ष शिवाजी पाटील, सुनील मोदी, बबन रानगे, सागर भोगम, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------
चौकट
अनेक गावांत दुखवटा
आमदार पी. एन. पाटील यांनी अनेक गावांत सहकारी संस्था उभारल्यामुळे कार्यकत्यांचे जाळे करवीर तालुक्यात निर्माण केले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच खुपिरे, कसबा बीड यासह अनेक गावांत सर्व व्यवहार बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला.
--- ------
चौकट
आज रक्षाविसर्जन
आज त्यांच्या पार्थिवावर करवीर तालुक्यातील सडोली खालसा या मूळ गावी अत्यसंस्कार करण्यात आले. उद्या ( शुक्रवारी) सकाळी रक्षाविसर्जन विधी होत आहे.
---------
चटका लावणारा मृत्यू
आमदार पाटील महिन्याभरापासून काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारात सक्रिय होते. पण, लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच त्यांचा झालेला मृत्यू चटका लावणारा ठरला.
---
भोगावती परिसरातील काँग्रेस पोरकी झाली
पी. एन. पाटील नावाच्या एकछत्री अंमलाखाली दीर्घकाळ एकसंध असलेली भोगावती साखर कारखाना कार्यक्षेत्रातील काँग्रेस आज पोरकी झाली. परिसरातील या पक्षाचा बाप माणूस म्हणून दीर्घकाळ त्यांनी नेतृत्व केले. त्यांच्या आधारावरच येथील कार्यकर्ते मोठे झाले, त्यांचा आधारवड कोसळल्याची भावना या परिसरात आहे.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com