करवीर विधानसभा वार्तापत्र

करवीर विधानसभा वार्तापत्र

करवीर विधानसभा
कुंडलिक पाटील


मान अन् ७१ हजारांचे मताधिक्यही...
कुडित्रे : मान गादीला मत मोदीला, मोफत रेशन, पीएम किसान, सामाजिक ध्रुवीकरण आणि अर्थकारण हे अंडरकरंट फेल ठरले. करवीर मतदारसंघ विजयाचा मानकरी ठरला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना करवीरमधून ७१ हजारांचे मताधिक्य देत मान आणि मतही गादीला दिले. शाहूंच्या वारसाला असलेल्या सहानुभूतीचे मतात परिवर्तन झाले. जनतेने पहिल्यांदाच करवीरच्या राजाला खासदार केले. या विजयाचा विधानसभा निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे.

छत्रपती शाहू महाराजांना एकूण २६ फेरीत १, ५७, ५१८ मते मिळाली. संजय मंडलिक यांना ८५,५५८ मते मिळाली. येथे दिवंगत आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार चंद्रदीप नरके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. करवीरच्या मताधिक्यावर छत्रपती शाहू महाराज विजयी झाले असले तरी विजयाचे शिल्पकार ठरलेले आमदार पी. एन. पाटील यांचे निधन म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्या रूपाने गड आला पण, पी. एन. पाटील यांच्या निधनाने करवीरचा सिंह गेला, अशी भावना व्यक्त होत होती.
संजय मंडलिक यांचा संपर्क नसल्याचा परिणाम मतांवर दिसला. यामुळे मत मोदीला मागितले गेले. मात्र, शाहू महाराज करवीरचे राजा म्हणून भावनिक होऊन मतदान झाले. गत निवडणुकीत संजय मंडलिक यांना ३८ हजारांचे मताधिक्य होते. यावेळी शाहू महाराज यांना करवीरमधून ७१ हजारांचे मताधिक्य मिळाले. आमदार विनय कोरे यांचे पन्हाळ्यातून ८० टक्के मताधिक्याचे आश्वासन हवेतच विरले आहे. आमदार सतेज पाटील यांच्या गगनबावड्यातून शाहू महाराजांना साडेसहा हजारांचे मताधिक्य मिळाले. पी. एन. पाटील यांच्या प्रभावक्षेत्रात ४० हजारांचे मताधिक्य मिळाले. गतनिवडणुकीत पी. एन. पाटील, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धनंजय महाडिकांना वगळून संजय मंडलिक यांना मतदान केले होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांचे न ऐकता शाहू महाराजांना मतदान केल्याचे दिसते.

चौकट
परिणामकारक घटक
मान गादीला, मतही गादीला
छत्रपती शाहू महाराज यांचे जनतेने फेडले पांग
भावनिक मुद्द्यावर करवीरमधून ७१ हजार ९६० चे मताधिक्य
पी. एन. पाटील यांच्या प्रभावक्षेत्रात ४० हजारांचे मताधिक्य
संपर्क नसल्याने एकाही फेरीत संजय मंडलिकाना मताधिक्य नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com