पत्रकार परिषद, खुलासा  कोपार्डे

पत्रकार परिषद, खुलासा कोपार्डे

पाणी, रस्ते, विजेचे प्रश्‍न
कोपार्डेत आम्हीच सोडविले

सरपंच मेघा पाटील यांच्यासह सदस्यांची माहिती

कुडित्रे, ता. ७ : कोपार्डेचा आम्ही विकास केला आहे. ग्रामपंचायतीला बदनाम करण्याच्या उद्देशाने विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत. चुकीची माहिती सांगून ग्रामस्थांची दिशाभूल केली जात आहे. विरोधकांच्या काळात आठ दिवसांनी पाणी मिळायचे. आमच्या काळात पाणी, रस्ते, विजेचे प्रश्न आम्ही सोडवले, असे सरपंच मेघा पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
जिल्हा परिषद माजी सदस्य विलास पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते. यासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी आज पत्रकार बैठक घेतली. सरपंच मेघा पाटील व सदस्यांनी जलजीवन मिशन योजनेचा निधी १४ टक्के वाढीवसह ४ कोटी ८२ लाख रुपये असल्याचे सांगून नियमानुसार खर्च करणे अनिवार्य असून वाढीव वस्तीसाठी वाढीव प्रस्ताव दिला असून त्याची गरज असल्याचे सांगितले. कुलभूषण पाटील यांनी मुख्य पाईपलाईन, अंतर्गत पाईपलाईन, पाण्याची टाकी, इंटेक याबाबत नकाशा घेऊन माहिती सांगितली. इंटेकसाठीच्या ठरावावर १२ सदस्यांच्या सही असल्याचा ठरावही दाखविला. विरोधकांनी ३० मे रोजी पत्रकार बैठक घेतली. चार जूनला अहवाल मागवण्याचा अर्ज केला असल्याचे सांगितले. एमबी देणे जिल्हा परिषदचे काम आहे. सर्वांना माहिती देण्यास बांधील असून ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा डाव असल्याचे पाटील म्हणाले. यावेळी माजी पोलिसपाटील नामदेव पाटील यांनी, जनजीवन मिशनचे काम घेण्यासाठी मंत्र्यांकडे विरोधकांनी धाव घेतली, असा आरोप केला. स्वार्थापोटी विलास पाटील बिनबुडाचे आरोप करत आहेत. पंधरा वर्षे दोन पाणी योजना मंजूर असताना करता आल्या नाहीत. ते आम्ही तीन वर्षात केले. यावेळी एस. के. पाटील यांनी, प्रत्येक कामात तुमचे आडवे का, असा प्रश्न उपस्थित करून वाढीव पाईपलाईनच्या ७० लाखांत तुमचाच स्वार्थ दडल्याचा आरोप केला.
यावेळी उपसरपंच सुरेश कांबळे, सदस्य सरदार जामदार, कुलभूषण पाटील, संभाजी पाटील, केशव पाटील, ओमकार कांबळे, नामदेव पाटील, एस. के. पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com