'' पी.एन.पाटील यांच्या माघारी आमची जबाबदारी ''  कार्यकर्त्यांचा निर्धार

'' पी.एन.पाटील यांच्या माघारी आमची जबाबदारी '' कार्यकर्त्यांचा निर्धार

05113, 05114
वाकरे : येथील मेळाव्यात पी. एन. पाटील यांच्या माघारी राजेश-राहुल पाटील यांच्या पाठीशी राहण्याची शपथ घेताना नेते, कार्यकर्ते.
...

पी. एन. यांच्या माघारी आमची जबाबदारी
कार्यकर्त्यांचा निर्धार : वाकरेत मेळावा, राजेश-राहुल पाटील यांच्या पाठीशी निष्ठेने राहणार
कुडित्रे, ता. ९ : दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी चार दशके जनसेवेसाठी वाहून घेतले. गांधी घराणे, काँग्रेसवरची निष्ठा आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम ढळू दिले नाही. कार्यकर्त्यांच्या मागे राहणारा आधारवड हरपला आहे. त्यामुळे त्यांच्या माघारी त्यांच्या कुटुंबाच्या मागे राहण्याची जबाबदारी आपली असल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. विधानसभेला मोठा विजय संपादन करण्यासाठी राजेश-राहुल पाटील यांच्या पाठीशी निष्ठेने राहण्याची शपथ कार्यकर्त्यांनी घेतली.

वाकरे (ता. करवीर) येथील विठाई-चंद्राई लॉनमध्ये दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभा आणि समर्थकांचा मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी बी. एच. पाटील होते. यावेळी करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी तालुक्यांतील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, ‘पी. एन. पाटील यांचे विचार जपण्यासाठी त्यांचे पुत्र राजेश-राहुल या राम-लक्ष्मणच्या जोडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया.’
‘गोकुळ’चे माजी संचालक पी. डी. धुंदरे म्हणाले, ‘पी. एन. यांच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्व कार्यकर्ते राजेश व राहुल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, अशी राधानगरी तालुक्याच्या वतीने ग्वाही देतो.’ बी. एच. पाटील म्हणाले, ‘पी. एन. यांचे कुटुंब जो निर्णय घेतील ते नेतृत्व मानूया. कार्यकर्त्यांची दिशा स्पष्ट व्हावी म्हणून हा मेळावा होता. सर्वांनी हातात हात घालून पांडुरंगाची ही दिंडी पुढे नेऊया.’
‘गोकुळ’चे संचालक बयाजी शेळके म्हणाले, ‘पी. एन. पाटील यांच्यासारख्या एकनिष्ठ नेत्याचे विचार जपण्यासाठी गगनबावडा तालुका पाटील कुटुंबाच्या पाठीशी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठामपणे उभा राहील.’ याप्रसंगी जयसिंग हिर्डेकर, शाहू काटकर, भरत मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी ‘भोगावती’चे चेअरमन शिवाजीराव पाटील म्‍हणाले, ‘गोकुळ’चे संचालक बाबासो चौगले, प्राचार्य आर. के. शानेदिवाण, बाजार समितीचे सभापती भारत पाटील, उदयानीदेवी साळुंखे, बी. के. डोंगळे, पांडुरंग पाटील, एम.आर.पाटील-कुरुकलीकर, प्रकाश मुगडे, आप्पासाहेब माने, दत्तात्रय पाटील, दादू कामिरे, विजय कांबळे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची भाषणे झाली.
यावेळी किशाबापू किरुळकर, गगनबावडा तालुकाध्यक्ष बजरंग पाटील, संभाजी पाटील, अमर पाटील, एकनाथ पाटील, शिवाजी कवठेकर, संदीप पाटील, शिवाजी कारंडे आदींसह गोकुळ, भोगावती कारखाना, राजीवजी सूत गिरणी, निवृत्ती संघ, यशवंत बँक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांनी केले. शपथ वाचन डॉ. लखन भोगम यांनी केले. काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील यांनी आभार मानले.
...
राजेश-राहुल पी. एन. पाटील बोलतोय...
‘दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचा फोन सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी सदैव तयार होता. ‘पी. एन. पाटील बोलतोय ...’ म्हणून कार्यकर्त्यांचे काम होत होते. यापुढे त्यांच्या मुलांनी फोनवरून मी ‘राजेश राहुल पी. एन. पाटील बोलतोय ...'' असाच उल्लेख करावा. यानिमित्ताने पुन्हा ‘एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह’ची आठवण होत राहील’, असे निवृत्ती संघाचे अध्यक्ष ए. डी. माने यांनी सुचविताच कार्यकर्ते भावूक झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com