भटक्या जमातीच्या नागरिकांचे १०७१ दाखले वितरित

भटक्या जमातीच्या नागरिकांचे १०७१ दाखले वितरित

Published on

05201

भटक्या जमातीच्या नागरिकांचे
१०७१ दाखले करवीरमध्ये वितरित

कुडित्रे ता.६ :
करवीर प्रांत कार्यालय व तहसीलदार कार्यालयाच्या वतीने भटक्या जमातीच्या नागरिकांचे १०७१ हस्तलिखित दाखले शिबिरात वाटप करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी हरीश धार्मिक ,तहसीलदार स्वप्निल रावडे, नायब तहसीलदार विजय जाधव, निवासी नायब तहसीलदार भालचंद्र यादव , विविध समाजाचे नागरिक उपस्थित होते.
भटक्या जमाती मधील नंदीवाले ,डवरी ,डोंबारी, वडर, कांजर भाट या समाजातील नागरिकांचे महसूल पुरावे नव्हते ,शासन निर्णयाप्रमाणे महापालिका ,ग्रामपंचायत व घर चौकशी केल्यानंतर आधार कार्ड व शाळेची दाखले घेऊन या समाजातील नागरिकांना दाखले देण्यात आले. यावेळी नंदीवाले समाजातील २१३,डवरी ३७३,डोंबारी २५, वडर १०९, कांजर भाट ३५१,असे एकूण १०७१ दाखले देण्यात आले.
नंदीवाले समाजातील संघटनेचे अध्यक्ष बाजीराव नंदीवाले, उपाध्यक्ष सागर नंदीवाले, शरद नंदीवाले, शंकर नंदीवाले, परशुराम नंदीवाले व सर्व समाजातील कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.