साऊंड सिस्टिममुक्त गणेशोत्सवामुळे पंधरा लाखाची बचत

साऊंड सिस्टिममुक्त गणेशोत्सवामुळे पंधरा लाखाची बचत
Published on

05452
वाकरे : येथे अजित स्पोर्टस्‌ या तरुण मंडळांने पारंपरिक बॅन्जो वाद्यात गणरायाची काढलेली विसर्जन मिरवणूक.

...अन् ज्येष्ठांचे गावाबाहेर जाणे थांबले!

‘सिस्टीम’चा दणदणाट वाकरेत टाळला; मंडळांची बचत, महाप्रसादाचा पायंडा

कुंडलिक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. १५ : साउंड सिस्टीमच्या दणदणाटामुळे काळजाचा ठोका चुकत असे. यामुळे सुमारे २०० ज्येष्ठ नागरिक एक दिवसासाठी या दणदणाटापासून गावातून दूर जाऊ लागले. यंदा मात्र साउंड सिस्टीममुक्त गणेशोत्सव करण्याचा निर्णय तरुणांनी घेतला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाच्या मिरवणुका निघाल्या आणि ज्येष्ठ नागरिक गावातच थांबू लागले. यातून तरुण मंडळांची पंधरा लाखांची बचतसुद्धा झाली आणि त्यातून यंदा सहा मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले. तरुण मंडळांच्या या विधायक उपक्रमाबद्दल वाकरे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत असून; ग्रामस्थ ग्रामपंचायत, तरुण मंडळे आणि करवीर पोलिसांचे कौतुक करीत आहेत.
श्री ज्योतिर्लिंग देवस्थान हे वाकरे गावचे ग्रामदैवत असून, सुमारे सात हजार लोकसंख्या आहे. चैत्राला येथे मोठी यात्रा भरते. गावात एकूण २१ तरुण मंडळे असून, गतवेळी चैत्र यात्रेला १२ तरुण मंडळांनी साउंड सिस्टीम लावले होते. त्‍यावेळी ज्येष्ठ नागरिकांना आवाजाचा मोठा त्रास झाला. यावेळी सुमारे दोनशे नागरिकांनी एक दिवस गाव सोडून दूर जाणे पसंत केले होते. मागील अनुभव पाहता ग्रामपंचायतीतर्फे सरपंच अश्‍विनी पाटील, उपसरपंच धनाजी पाटील, सर्व सदस्य, करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, पोलिस अविनाश पवार, हवालदार प्रदीप यादव, अशोक मंत्री, राजेंद्र संकपाळ यांनी सर्व तरुण मंडळांची बैठक घेऊन साउंड सिस्टीममुक्त गणेशोत्सवाचे आवाहन केले होते. ग्रामपंचायतीतर्फे सर्व तरुण मंडळांना तसे पत्र देण्यात आले. यातूनही दोन मंडळांनी साउंड सिस्टीमला परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी त्यांचे साउंड सिस्टीममुक्‍त उत्सव करण्याबाबत प्रबोधन केले.
मग, तरुण मंडळांनी बेंजो, लेझीम अशा पारंपरिक वाद्यात गणेशोत्सव साजरा केला. महिलांसाठी झिम्मा-फुगडीचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. साउंड सिस्टीममुक्त उत्सवामुळे गावातील सर्व २१ मंडळांचे मिळून १५ लाख रुपयांची बचत झाली. यातील सहा तरुण मंडळांनी या बचत झालेल्या पैशांतून महाप्रसाद घातला आणि महाप्रसादाची परंपरा सुरू केली.
--------------
चौकट
नवा आदर्श...
साउंड सिस्टीममुक्त गणेशोत्सवामुळे ज्येष्ठ नागरिकांनी यंदा गाव सोडले नाही. ग्रामपंचायत, करवीर पोलिस आणि तरुण मंडळांचे पालक व ज्येष्ठ नागरिकांनी आभार मानले आहेत. इतर गावातील तरुण मंडळांना या गावातील मंडळांसाठी असा नवा आदर्श निर्माण केला आहे.
-----------------
कोट
तरुण मंडळे, करवीर पोलिस आणि ग्रामपंचायतीतर्फे सिस्टीममुक्त गणेश उत्सव साजरा करण्यात आला. या सर्वांचे आभार. पुढच्या वर्षी देखाव्यांसाठी ग्रामपंचायतीतर्फे बक्षीस दिले जाणार आहे.
- अश्‍विनी चंद्रकांत पाटील, सरपंच, वाकरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Ganeshotsav
DJ Sound: डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने गेले एकाचे कान? किल्लेमच्छिंद्रगड येथे झालेल्या त्या प्रकरणाचे पुढे काय झाले?
DJ Sound Debate Intensifies in Pune; Police Conduct Testing Before Ganeshotsav
solapur city DJ Noise Case
Marathi News Esakal
www.esakal.com