

मुलाखत चंद्रदीप नरके
‘करवीर’च्या विकासाचे व्हिजन
करवीर : जनतेने १५ वर्षं करवीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व दिले. मतदारसंघ शहरालगचा आणि डोंगरी भागाचा आहे. मध्य सेंटरला एमआयडीसी स्थापन करून तरुणांच्या हाताला काम देणे, तसेच आरोग्यासाठी प्रत्येक तालुक्याला शासनाच्या माध्यमातून मल्टीस्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करणे, विद्यार्थी, महिला, शेतकरी यांच्यासाठी आणि सर्व घटकांसाठी विकासाभिमुख काम करणे व्हिजन राहील. मतदार संघातील गावांचा समतोल विकास करणे, गावे मुख्य रस्त्याला, मुख्य रस्ता शहराला जोडून शेतीचा आणि शेतकऱ्यांचा विकास साधणे आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळापर्यंत सामान्य घटकापर्यंत पोहोचवणे हे आपले व्हिजन राहील, अशी माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
प्रश्न : आपले व्हिजन कोणते?
उत्तर : मतदारसंघात आयटी पार्क, एमआयडीसी स्थापन करणे, तसेच औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारून विद्यार्थ्यांचे करिअर करणे आणि शासनाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला मल्टीस्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करण्याच्या दृढनिश्चय आहे. शासनाच्या माध्यमातून ऊस पीक विम्याखाली आणणे,
शेतीपूरक मालावर प्रक्रिया उद्योग उभा करणे, गगनबावडा येथे इको टुरिझम, तसेच प्रकल्प तलाव सातेरी, वाघजाई, गगनबावडा, नंदवाळ प्रतिपंढरपूर या तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राचा विकास करणे. कोरोना काळात वडणगे, कुंभीवर सेंटर सुरू केले. घरी न बसता थेट रुग्णांपर्यंत पोहचून त्यांना औषधोपचार मिळवून देणे असे जीव धोक्यात घालून काम केले. तालुक्याच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर व सुसज्ज हॉस्पिटल करण्याचे उद्दिष्ट आहे.
प्रश्न : मतदारसंघात विकासकामांची स्थिती काय?
उत्तर : पहिल्या आमदारकीच्या काळात ३०० कोटींची दुसऱ्या टप्प्यात साडेआठशे कोटींची विकासकामे केली. गावातील रस्ते, मुख्य रस्त्याला, मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडून शेतीचा विकास साधला जाईल. शासनाच्या विविध योजनांतून गावांना जोडणारे रस्ते अंतर्गत रस्ते याचा विकास सुरू आहे. नुकतीच कोल्हापूर -गगनबावडा रस्त रुंदीकरणाबाबत शेतकरी, नागरिकांचे अनेक प्रश्न होते .याबाबत जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी, शेतकरी, सरपंच यांची बैठक लावून हे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
प्रश्न : लोकप्रतिनिधी असताना केलेली कामे कोणती ?
उत्तर : निगवे दुमाला, बाचणी, गगनबावडा येथे तालुका क्रीडा संकुल मंजूर केले. कामकाज सुरू असून यापुढे ते विकसित करण्याचे काम करू. मुख्यमंत्री, पंतप्रधान सडक योजनेतून रस्ते करू, पाणंद रस्ते विकसित करणे हा शासनाचा अजेंडा आहे. मुलींसाठी महिला विद्यालय, कौशल्य विकास शिक्षण सुरू करणे, ‘कुंभी’वर कुस्ती संकुल केले. नेमबाजी केंद्र केले. फुटबॉल, अर्ध मॅरेथॉन स्पर्धा घेतल्या जातात. पुढे ‘कुंभी’वर स्विमिंग, इनडोअर गेम, फुटबॉल, क्रिकेट, सुसज्ज जिम असे वेल इक्विपमेंट क्रीडा संकुल करू. शहरालगतच्या गावामध्ये व मतदारसंघाचे मॉडेल प्लॅन करू.
प्रश्न : लाडकी बहीण योजनेची स्थिती काय आहे.
उत्तर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघात लाखो महिलांना याचा लाभ मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे गोरगरीब महिलांसह त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागला आहे. झालेल्या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध आमची जनशक्ती एकवटली होती.
प्रश्न: मतदार संघात किती वेळ जातो?
उत्तर : सकाळी सातला कोल्हापूर येथे घरी कार्यकर्त्यांची गर्दी असते. येथे ग्रामस्थ, कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवले जातात. यानंतर दिवसभर कुंभी कारखाना व नंतर मतदारसंघात नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होतो. रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघात होतात. अशावेळी मतदारसंघात असताना तातडीने स्वतः घटनास्थळी भेट देऊन रुग्णाला दवाखान्यात पोहोचवण्यापर्यंत जबाबदारी पार पाडली. मतदारसंघातील वाडी-वस्ती ते गल्लीपर्यंतची सर्व माहिती असून तेथील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे.
शब्दांकन ः कुंडलिक पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.