
कागल : आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षा उत्साहात
04593
कागल : प्रश्नपत्रिका संयोजकांकडे देताना आमदार मुश्रीफ. यावेळी डॉ. कमळकर, सुकुमार पाटील आदी.
दर्जेदार प्राथमिक शिक्षणाने
देश सुदृढ ः आमदार मुश्रीफ
मुश्रीफ फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षा
कागल, ता. ५ : दर्जेदार व गुणवत्ता प्राथमिक शिक्षणाने देश सुदृढ होईल. शिक्षकांवर ज्ञानदानासारखी पवित्र व राष्ट्र निर्माणाच्या कार्याची जबाबदारी आहे. त्यांनी झोकून देऊन काम केल्यास समृद्ध विद्यार्थ्यांची पिढी तयार होईल, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
येथील यशवंतराव घाटगे हायस्कूलमध्ये शिष्यवृत्ती सराव परीक्षा प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षांच्या प्रारंभी ते बोलत होते.
आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘दरवर्षी पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि आत्तापर्यंत ८० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.’ प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर म्हणाले, ‘आमदार मुश्रीफ यांच्या दूरदृष्टीतून गोरंबेसारख्या डोंगराळ गावात देशातील पहिली फ्युचरिस्टिक क्लासरूम झाली.’ पदवीधर शिक्षक संघटनेचे सुकुमार पाटील यांनी स्वागत, सूत्रसंचालन ज्योतिर्लिंग तोडकर यांनी केले. नरेंद्र बोते यांनी आभार मानले. शिक्षणविस्तार अधिकारी आर. एस. गावडे, केंद्रप्रमुख श. र. इनामदार, मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष व्ही. जी. पोवार, मुख्याध्यापक व्ही. डी. मगदूम, केंद्र संचालक संदीप सणगर, सम्राट सणगर, शहाजी पाटील, प्रज्ञा पोवार, वनिता साबणेंसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.