कागल : (सुधारित) महामार्ग पोलिस दंडात्मक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : (सुधारित) महामार्ग पोलिस दंडात्मक कारवाई
कागल : (सुधारित) महामार्ग पोलिस दंडात्मक कारवाई

कागल : (सुधारित) महामार्ग पोलिस दंडात्मक कारवाई

sakal_logo
By

Kgl४१.jpg
04601
कागल : महामार्ग पोलिस मदत केंद्र, उजळाईवाडी
-----------
वाहनधारकांना ३ कोटींवर दंड
नियमांचे उल्लंघन; उजळाईवाडी महामार्ग पोलिसांची गतवर्षात कारवाई

नरेंद्र बोते / कागल
कागल ता. ५ : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गतवर्षभरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७ हजार २८२ वाहनांवर उजळाईवाडी महामार्ग पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईतून ३ कोटी १३ लाख ९१ हजार ९०० रूपयांचा दंड वसूल केला.१० हजार ९९९ वाहनांनी वेगमर्यादा ओलांडल्याने त्यांच्याकडून १ कोटी ९५ लाख ७५ हजारांचा दंड केला. महामार्गावरील साईन बोर्डचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६ हजार ८०२ वाहनांवर कारवाई करत ६८ लाख २५ हजार ५०० रु. दंड वसूल केला.

राष्ट्रीय महामार्ग पुणे - बंगळूर व बंगळूर - पुणे लेनवर वाहतुकीत सर्वाधिक व्यस्त असलेला देशातील हा प्रमुख महामार्ग आहे. दक्षिणेतील सर्वच राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गावरून दररोज वीस हजारांपेक्षा अधिक वाहने धावतात. सुलभ वाहतुकीसाठी महामार्ग चौपदरीकरण झाले. आता सहापदरीकरण सुरू आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे. उजळाईवाडी महामार्ग पोलिसांनी पेठ नाका ते कागलदरम्यान वर्षभरात २७ हजार २८२ वाहनांना दंड केला. वाहनधारक आणि चालकाकडून ३ कोटी १२ लाख ९१ हजार २०० रुपयांचा महसूल वसूल केला. वेगमर्यादा उल्लंघन, साईन बोर्ड, सीट बेल्ट, हेल्मेटचा वापर न करणे, नो पार्किंगमध्ये वाहन आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणे आदीप्रकरणी महामार्ग पोलिसांनी कारवाई केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या संख्येतही वाढ होत आहे. ही बाब चिंताजनक आहे.
-------------
कोट
जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू आहे. कारखान्यांवर जाऊन ऊसवाहतूक ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडीचालकांना वाहतूक नियमांबाबत प्रबोधन केले आहे. वाहनांना रिफ्लेक्टर लावले आहेत. मद्यप्राशन करून, मोबाईलवर बोलत, टेपरेकॉर्डर लावून वाहन चालवू नये. बरोबरीने वाहन चालवू नये, महामार्गावर पार्किंग करू नये, नियमांचे पालन करावे.
- चंद्रकांत शेडगे, प्रभारी अधिकारी,
महामार्ग पोलिस मदत केंद्र, उजळाईवाडी