कागल : राजे बँकेमार्फत भाजीपाला विक्रेत्यांना अर्थसहाय्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : राजे बँकेमार्फत  भाजीपाला विक्रेत्यांना अर्थसहाय्य
कागल : राजे बँकेमार्फत भाजीपाला विक्रेत्यांना अर्थसहाय्य

कागल : राजे बँकेमार्फत भाजीपाला विक्रेत्यांना अर्थसहाय्य

sakal_logo
By

04644
कागल ः येथे समरजितसिंह घाटगे यांच्याहस्ते भाजी विक्रेत्यांना कर्जमंजुरी पत्रे दिली.

राजे बँकेमार्फत भाजीविक्रेत्यांना अर्थसहाय्य
कागल : येथील राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँकेमार्फत श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज व्यवसाय वृध्दी कर्ज योजनेंतर्गत भाजीपाला विक्री व्यवसायाकरिता आठ व्यावसायिकांना कर्ज वाटप केले. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेमार्फत श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज व्यवसाय वृध्दी कर्ज योजना सुरु केली आहे. सवलतीत विनातारण कर्ज देण्यात येते. इंदुबाई श्रीकांत कदम, भागिरथी रामचंद्र नेलें, पार्वती शंकर करीकट्टे, लक्ष्मी रामचंद्र आपटे, पाकीजा नूरमहमद मुल्ला, संगीता मनोहर टोणपे, गौराबाई शंकर वड्ड (सर्व कागल) व लैला रमजान खंडारे (रा. कसबा सांगाव) यांचा समावेश आहे. यांनी घाटगे यांचे आभार मानले.