कागल : समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

कागल : समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

04677
समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी
मान्यवरांकडून अभिष्टचिंतन ः पुस्तके, वह्यांच्या रुपात शुभेच्छांचा वर्षाव
कागल, ता. १९ : शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन या प्रधान कार्यालय येथे त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. राजकीय, सामाजिक, सहकार, कला, क्रीडा, कृषी आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. घाटगे यांना पुस्तके, वह्या व रुमाल बुके स्वरूपात नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. माजी प्राचार्य जीवन साळुंखे यांनी स्वलिखित दोनशे पुस्तके शुभेच्छारुपात दिली.
वाढदिवसानिमित्त गावोगावी रक्तदान, आरोग्य शिबिर, रुग्णांना फळे वाटप, व्याख्यान, कामगारांच्या मुलांना खाऊ वाटप तसेच गरीब पाच मुलींच्या नावाने एक हजार रुपयांची ठेव असे विविध उपक्रम राबवण्यात आले. राजमाता जिजाऊ समितीने वृद्धाश्रमात धान्य वाटप केले. यावेळी शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कर्नाटकचे माजी ऊर्जाराज्यमंत्री वीरकुमार पाटील, राजे बँक अध्यक्ष एम. पी. पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.
खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, बिद्रीचे संचालक बाबासाहेब पाटील, गोकुळ माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, माजी महापौर सुनील कदम, सत्यजीत कदम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल देसाई, भाजप जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील, अॅड. सुरेश कुराडे, संभाजी आरडे, भगवान काटे, के. जी. नांदेकर, शशिकांत खोत, अभिषेक बोंद्रे, डॉ. संदीप पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, मयूर उद्योगसमूहाचे संजय पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.
यांच्याकडून दूरध्वनीवरून शुभेच्छा
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, शिवाजी पाटील (चंदगड), सुजित मिणचेकर, पृथ्वीराज महाडिक, गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील आदींनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

चौकट
विमानतळावरच वाढदिवस साजरा
केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या स्वागतासाठी उजळाईवाडी विमानतळावर आमदार गोपीचंद पडळकर व समरजितसिंह घाटगे उपस्थित होते. तेथेच आमदार पडळकर यांनी श्री. घाटगे यांना स्वतः फेटा बांधून शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com