Sat, April 1, 2023

कागल : बाळासाहेब ठाकरे जयंती संपन्न
कागल : बाळासाहेब ठाकरे जयंती संपन्न
Published on : 31 January 2023, 2:26 am
कागलला बाळासाहेब ठाकरे जयंती
कागल : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती येथे झाली. प्रतिमापूजन तसेच सामाजिक बांधिलकी जपत मत्तीवडेत देवांश सामाजिक संस्थेला जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शिवगोंड पाटील, शहर संघटिका दीपाली घोरपडे, पवन पाटील, वैभव आडके, धनाजी नागराळे, दयानंद स्वामी, विलास चव्हाण, अरविंद चौगुले, अमित डुम यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.