कागल : विकास आराखडा शेतकरी - मुश्रीफ बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : विकास आराखडा शेतकरी - मुश्रीफ बैठक
कागल : विकास आराखडा शेतकरी - मुश्रीफ बैठक

कागल : विकास आराखडा शेतकरी - मुश्रीफ बैठक

sakal_logo
By

04764

कागल प्रारूप विकास
आराखड्याला स्थगिती आणू

आमदार मुश्रीफ; हरकती दाखल करण्याचे आवाहन

कागल, ता. ९ : पालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात बहुतांश शेतकरी आणि प्लॉटधारकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सर्वांनी वेळेत हरकती दाखल कराव्यात. खासदार संजय मंडलिक यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आराखड्याला स्थगिती आणू, असे आश्वासन आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले.
पालिकेने प्रारूप विकास आराखडा प्रसिध्द केला आहे. नवीन रस्ते, खुल्या जागा, एसटीपी प्लॅंट, शॉपिंग सेंटरसह इतर कारणांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित केल्या आहेत. यानिमित्त आमदार मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शाहू सभागृहात शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘पूर्वीची आरक्षणे रद्द करून नवीन जागेत आरक्षणे का टाकली, याचा विचार करण्याची गरज आहे. नवीन आरक्षणामुळे काहीजण भूमिहीन तर काही अल्पभूधारक होणार आहेत. नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असल्याने खासदार संजय मंडलिक यांना सोबत घेऊन त्यांची भेट घेऊन स्थगिती मिळवू. शेतकरी आणि मिळकतधारकांनी वेळेत हरकती आणि सूचना कळवाव्यात. कमी नुकसान आणि जमीन जाणारा विकास आराखडा सर्वसंमतीने करू. आम्ही मंजूर केलेल्या विकासकामांची उद्घाटने करणारे विकासआराखड्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत असे ते महणाले.
यावेळी भैया माने, प्रकाश गाडेकर, सौरभ पाटील, प्रवीण काळबर यांनी मनोगत व्यक्त केले. गजानन परीट, महेश घाटगे, कुणाल सणगर, सचिन मठुरे, महेश चौगुले, सुहास हिंगे या शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. बैठकीस नवल बोते, विकास पाटील, संजय चितारी, अजित कांबळे, विवेक लोटे, शामराव पाटीलसह शेतकरी उपस्थित होते.