कागल : अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी कागल मधील विकास कामांचा लोकार्पण सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी कागल मधील विकास कामांचा लोकार्पण सोहळा
कागल : अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी कागल मधील विकास कामांचा लोकार्पण सोहळा

कागल : अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी कागल मधील विकास कामांचा लोकार्पण सोहळा

sakal_logo
By

अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी
कागलमध्ये विकासकामांचे लोकार्पण

कागल, ता. १४ : माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून झालेल्या कागल नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा व शेतकरी, युवक व महिला मेळावा शुक्रवारी (ता. १७) होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक भैया माने व प्रवीण काळबर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘आमदार हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून झालेल्या राजमाता जिजाऊ माँसाहेब उद्यानाचा लोकार्पण सायंकाळी ४ वाजता श्रमिक वसाहत कागल येथे होणार आहे. त्यानंतर श्रीमंत जयसिंगराव महाराज (बाळ महाराज) पुतळ्याचे सुशोभीकरण बसस्थानक परिसरात होणार आहे. तसेच श्री राधाकृष्ण मंदिर सभा मंडप विस्तारीकरण शुभारंभ सायंकाळी साडेपाच वाजता श्री राधाकृष्ण मंदिर (निपाणी वेस) येथे होणार आहे. सायंकाळी सहा वाजता अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी, युवक व महिला मेळावा येथील ऐतिहासिक गैबी चौकात होणार आहे.
दरम्यान, खासदार वंदना चव्हाण यांच्या निधीतून डी. आर. माने महाविद्यालयात स्व. वाय. डी. माने (अण्णा) सभागृह बांधले आहे. या अद्ययावत सभागृहाचे उद्‌घाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. खासदार वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल.