
कागल : कागल तालुक्यात चला करु प्रगत वर्ग अभियान निकाल जाहीर
‘चला करु प्रगत वर्ग’
अभियानाचा निकाल जाहीर
कागल , ता. १० : कागल तालुक्यात गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी चालू शैक्षणिक वर्षात ''चला करु प्रगत वर्ग'' अभियान राबविले. या अंतर्गत तालुक्यातील दहा केंद्रातील प्रत्येक इयत्तेचे पहिले तीन प्रगत वर्ग निवडण्यात आले. प्रथम तीन आलेल्या वर्ग शिक्षकांचा तालुकास्तरावर प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
प्रत्येक मूल ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्यामूळे शिक्षणात मुलाला केंद्रबिंदू मानण्यात आले आहे. याचा अर्थ प्रत्येक मूल महत्वाचे आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णयानुसार प्रत्येक मूल शिकले पाहिजे , यावर भर देण्यात आला आहे. हे महत्व लक्षात घेऊन कागल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शंभर टक्के मूले शिकली पाहिजेत. यासाठी गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी चालू शैक्षणिक वर्षात ''चला करु प्रगत वर्ग'' अभियान राबविले.
निकाल असा - पहिली - शशिकांत कुंभार (आनूर), आप्पासाहेब वागळे (अर्जूनवाडा), प्रदीप जाधव (बेलवळे बु॥), दुसरी - विवेक गवळी ( करड्याळ), शितल माळी ( बानगे), गणपती कुंभार (अर्जूनवाडा), तिसरी - मकरंद कोळी (मुरगूड), सचिन पाटील हमिदवाडा विठ्ठल पाटील कुरणी
चौथी - विश्वनाथ डफळे (सोनाळी), सुनील चौगुले (केनवडे), बाबासो कांबळे (हसुर खुर्द) , पाचवी - गीतांजली कमळकर (भडगाव), सुषमा कदम (चौंडाळ), सविता माने (करनूर), सहावी - बाबूराव राजुगडे (गोरंबे), अजित पाटील (करंजिवणे), उत्तम पाटील (बेलेवाडी काळम्मा), सातवी - अर्चना भरते (म्हाकवे) , संभाजी डवरी (बेनिक्रे), सारिका पाटील ( सुरुपली)