कागल : चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : चोरी
कागल : चोरी

कागल : चोरी

sakal_logo
By

कसबा सांगाव येथे दागिन्यांची चोरी

कागल : साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना (कसबा सांगाव, ता. कागल) येथे घडली. याबाबतची फिर्याद संध्या घड्याळे यांनी कागल पोलिस ठाण्यात दिली आहे. संध्या रावसाहेब घड्याळे (वय १९) या घराचा मुख्य दरवाजा व बेडरूमचा दरवाजा बंद करून घराशेजारी असलेल्या कट्ट्यावर त्यांच्या जाऊ मयुरी यांच्यासोबत बोलत बसल्या होत्या. याचवेळी अज्ञात चोरट्याने दरवाजाची कडी काढून घरात प्रवेश केला व बेडरूममधील तिजोरीत ठेवलेले पावणेदोन तोळ्याचे गंठण, पेंडल व सोन्याचे मणी असे एकूण साठ हजार रुपयांचे दागिने चोरले.अधिक तपास कागल पोलिस करीत आहेत.