कागल : २१ मार्च जागतिक वन दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल : २१ मार्च जागतिक वन दिन
कागल : २१ मार्च जागतिक वन दिन

कागल : २१ मार्च जागतिक वन दिन

sakal_logo
By

04918

वनसंस्कृतीचे संवर्धन
गरजेचे ः केसरकर

घाटगे हायस्कूलमध्ये जागतिक वन दिन

कागल, ता. २१ : जंगले मर्यादित आहेत. त्यामुळे दारात, मोकळ्या जागेत झाडे लावणे आवश्यक आहे. झाड आम्हाला भरपूर देते; पण आपण झाडाला काय देतो? प्रत्येक सण झाडाशी जोडलेला आहे. झाडांशी नाळ जोडलेली टिकवण्यासाठी वनसंस्कृतीचे संवर्धन होणे गरजेचे आहे. झाड तोडून नव्हे, झाड लावून सण साजरा करा, असे प्रतिपादन सामाजिक वनीकरण विभाग वनक्षेत्रपाल सोनल केसरकर यांनी केले.
येथील यशवंतराव घाटगे हायस्कूल व ज्युनि. कॉलेजमध्ये वनीकरण विभागाचे कागल परिक्षेत्र व हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिन झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. डी. मगदूम होते.
श्री. मगदूम म्हणाले, ‘औषधोपचारासाठी झाडेच उपयोगी पडतात. प्रत्येकाने एकतरी झाड लावून जगवावे.’ यावेळी सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने शाळेला रोपे भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती पत्रके वाटण्यात आली. कार्यक्रमास वनपाल प्रल्हाद देवर्डेकर, अनंत अमृसकर, शिवाजी माळी, अर्जुन पाटील, कांचन भालबर उपस्थित होते. स्वागत नरेंद्र बोते व प्रास्ताविक अशोक घाटगे यांनी केले. अंजुम मुजावर यांनी आभार मानले.