कागल :शिवराज नागरी पतसंस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा कृतज्ञता सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल :शिवराज नागरी पतसंस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा कृतज्ञता सोहळा
कागल :शिवराज नागरी पतसंस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा कृतज्ञता सोहळा

कागल :शिवराज नागरी पतसंस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा कृतज्ञता सोहळा

sakal_logo
By

04922
शिवराज पतसंस्थेतर्फे ज्येष्ठांप्रती कृतज्ञता
कागल : गुढीपाडव्यानिमित्ताने शिवराज नागरी पतसंस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा कृतज्ञता सोहळा झाला. कोष्टी गल्लीतील ९० वर्षे पूर्ण झालेल्या तीन ज्येष्ठ नागरिकांचा सपत्नीक सत्कार संस्थाध्यक्ष रमेश माळी यांच्याहस्ते झाला. अध्यक्षस्थानी अतुल जोशी होते. यावेळी डोंगरी विकास अंमलबजावणी जिल्हास्तरीय समितीच्या अशासकीय सदस्यपदी विजया निंबाळकर यांची निवड झाल्याबद्दल माजी नगराध्यक्षा माणिक माळी यांच्या हस्ते; तसेच महिलेचे सापडलेले दोन हजार रुपयांचे पाकीट प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल ऋतुराज माळी यांचाही सत्कार झाला. अतुल जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. लहान मुलांनी नृत्य सादर केले. यावेळी शिवाजी माळी, महादेव नाकील, करण माळी, श्रीमती लक्ष्मीबाई माळी आदींसह संचालक, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.