कागल : दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसडा मारून लंपास

कागल : दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसडा मारून लंपास

Published on

कागल येथे हिसडा मारून मंगळसूत्र पळविले

कागल: पती व मुलगा यांच्यासह मोटारसायकलवरुन जात असलेल्या महिलेचे एक लाख २० हजार रुपये किंमतीचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र अज्ञातांनी हिसडा मारून पळविले. ही घटना एसटी डेपो आगारासमोर सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद वर्षा रुपेश पाटील (वय ३२, रा. मुळ गाव दिगवडे, ता. पन्हाळा, सध्या रा. जयसिंगराव पार्क, कागल) यांनी कागल पोलिसांत दिली आहे. वर्षा ह्या पती व मुलासह मोटारसायकलवरून कोल्हापूरहून कागलकडे येत असताना ही घटना घडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.