

05877
कागल : पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन करताना संगणक परिचालक.
...
कागलला संगणक परिचालकांचे ठिय्या आंदोलन
कागल : ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून आकृतीबंधात तांत्रिक पद निश्चित करावे यासह अन्य मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्यावतीने कागल पंचायत समिती कार्यालयासमोर मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्यातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालक सन २०११ पासून तुटपुंज्या मानधनावर डेटा एंट्रीचे काम करत आहेत. शासनाने नेमणूक केलेल्या कंपनीकडून कधीही वेळेवर मानधन दिले जात नाही. महाराष्ट्र शासनाला संगणक परिचालकांनी गेल्या अनेक वर्षांपासून ऑनलाईन ई - पंचायतच्या माध्यमातून देशपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त करून दिलेत. आता या डेटा एंट्री ऑपरेटरवर चुकीच्या धोरणामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीत तांत्रिक पद निश्चित करून डेटा एंट्री ऑपरेटरना ग्रामपंचायत आकृतीबंध कर्मचारी म्हणून समाविष्ट करून घ्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष विशाल चिखलीकर, तालुकाध्यक्ष नियाज देसाई, सुरेश पाटील, तेजस्वीनी पाटील, दिपाली चौगुले आदींसह संगणक परिचालक सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.