उन्हाळा...! शेतकऱ्यांनो, पशुधन सांभाळा

उन्हाळा...! शेतकऱ्यांनो, पशुधन सांभाळा

कडक उन्हाळा...! शेतकऱ्यांनो, पशुधन सांभाळा

डॉ. सुमित पाटील ः उष्माघाताचा त्रास होऊ शकतो : काळजी घेण्याचे आवाहन

नरेंद्र बोते ः सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. १० : यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. माणसाला हा उन्हाळा असह्य होऊ लागला आहे. त्यात जनावरांची अवस्था माणसापेक्षाही वाईट होत आहे. उन्हामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवत आहे. माणसांप्रमाणे जनावरांनाही उष्माघाताचा त्रास होतो. जनावरांचे उष्माघातापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. यावर वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहन तालुका पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून केले आहे.
तापमानाचा पारा जास्त असूनही जनावरांना उन्हात बांधणे किंवा मोकळे सोडणे, पत्र्याच्या खोलीत बांधून ठेवणे, पिण्यासाठी पुरेसे पाणी न देणे, गोठ्यात खेळती हवा नसणे यामुळे जनावरांना उष्माघाताचा धोका होऊ शकतो. यासाठी पशुपालकांनी या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
उष्माघात झाल्यानंतर जनावरांची भूक मंदावते, अपचन होऊन दुधाचे प्रमाण कमी होते. शरीराचे मूळचे तापमान वाढणे अशी सौम्य लक्षणे आढळतात. जनावर खाली कोसळणे, जोरात धाप लागणे, झटका येऊन मृत्यू होण्याचीही दाट शक्यता असते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
...
चौकट...
जनावरांसाठी हे करा...
जनावरांना पिण्यासाठी दिवसभर मुबलक थंड पाणी उपलब्ध करावे. पत्र्याचे शेड असल्यास त्यावर नारळाच्या झावळ्या किंवा उसाचे वाढे टाका. पाण्यातून मीठ आणि साखर असे द्रावण करून द्यावे.
उष्माघाताची लक्षणे दिसल्यास जनावरांना तातडीने सावलीत न्यावे. थंड पाण्याने धुवावे. अंगावर सुती कपडे ओले करून टाकावीत. थोड्या वेळाने पिण्यास पाणी द्यावे. जनावरे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत बाहेर उन्हात बांधू नयेत किंवा सोडू नये. खेळती हवा असेल अशाच ठिकाणी जनावरे बांधावीत. गोठ्यात स्प्रिंकलर किंवा फॉगर बसवावे. गोठ्यात व्हेंटिलेशन ठेवावे.
...
कोट...
उन्हाळ्यात जनावरांना उष्माघाताचा त्रास होतो. लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार होणे गरजेचे आहे. तसेच जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. सुमित पाटील, पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती कागल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com