सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान होणार २१ वी पशुगणना

सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान होणार २१ वी पशुगणना

सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान
होणार २१ वी पशुगणना

सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. ७ : सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान २१ वी पशुगणना होणार आहे. जिल्हा पशुधन उपायुक्तांची जिल्हा पशुगणना अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे. महापालिका क्षेत्र वगळून ही पशुगणना केली जाणार आहे. महापालिकेचे आयुक्त प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
२०१९ नंतर २१ वी पशुगणना करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान पशुगणनेचे काम केले जाणार आहे. पशुगणनेअंतर्गत माहितीचे संकलन आणि छाननी ही विकसित मोबाईल अॅपद्वारे केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ग्रामीण भागातील तीन हजार कुटुंबांसाठी एक आणि शहरी भागातील चार हजार कुटुंबांसाठी एक प्रगणक या प्रमाणात नेमणूक केली जाणार आहे. ग्रामीण भागातील पाच प्रगणकांमागे एक, तर शहरी १० प्रगणकांमागे प्रत्येकी एका पर्यवेक्षकाची नेमणूक केली जाणार आहे. पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगांवकर यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.
कागल पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाला मिळाला असून, त्याप्रमाणे पशुसंवर्धन विभागाने नियोजन सुरू केले आहे. तालुक्यातील पशुगणनेकरिता १६ प्रगणकांची नेमणूक केली आहे. चार महिने हे काम चालणार असून, तंतोतंत माहिती संकलित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
...........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com