क्षयरोगमुक्तीत कागल तालुका अग्रेसर

क्षयरोगमुक्तीत कागल तालुका अग्रेसर
Published on

8104
कागल : येथील डॉ. नवनाथ मगदूम व डॉ. श्वेता मगदूम यांनी २०२४ मध्ये ३१ क्षयरुग्णांची नोंदणी करून सहकार्य केल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
.......
क्षयरोगमुक्तीत कागल तालुका अग्रेसर

मंत्री मुश्रीफ ः तालुकास्तरीय पुरस्कार वितरण

सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. ३० : ‘कागल तालुक्याने सर्व क्षेत्रांत चांगली प्रगती केली आहे. चांगल्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले,,’ असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये ‘क्षयमुक्त भारत अभियान’अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.       
यावेळी गोपीनाथ मुंडे अपघात योजनेच्या लाभार्थ्यांच्या नातेवाइकांना दोन लाख रुपये अनुदानाचे वाटप मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कागल येथील डॉ. नवनाथ मगदूम व डॉ. श्वेता मगदूम यांनी २०२४ मध्ये ३१ क्षयरुग्णांची नोंदणी करून सहकार्य केल्याबद्दल मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पेठवडगाव येथील रहो बोथ सेवा संस्थेने पाच रुग्णांची सहा महिन्यांसाठी दत्तक घेऊन फूड बास्केट पुरविले व क्षयमित्र म्हणून बांधिलकी जपल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, क्षयरोग  वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव  ठाकूर आदी प्रमुख उपस्थित होते.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी स्वागत केले. मुरगूड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भगवान डवरी, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सरिता थोरात, कृषी अधिकारी थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. थोरात यांनी आभार मानले.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com