कैलास गडची स्वारी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कैलास गडची स्वारी मंदिरात
विविध कार्यक्रमाचे आयोजन
कैलास गडची स्वारी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

कैलास गडची स्वारी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

sakal_logo
By

कैलास गडची स्वारी मंदिरात
उद्यापासून विविध कार्यक्रम
कोल्हापूर, ता. २५ : मंगळवार पेठ, खासबाग येथील कैलास गडची स्वारी मंदिराचा ६३ वा वर्धापन दिन सोहळा सोमवार २७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत होत आहे. या निमित्त ज्ञानेश्‍वरी पारायण, प्रवचन, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन आणि कलायोगी जी. कांबळे सार्वजनिक आर्ट गॅलरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व हळदी-कुंकू समारंभही आयोजित केले आहे.
सोमवारी (ता. ६) रात्री १० वाजता शिवालय भजनी मंडळ यांचे भजन व रात्री १२ वाजता रुद्राभिषेक घालण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. ७) सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण पुजा, सायंकाळी ५ वा. मर्दानी खेळ व सायंकाळी ६.०० वा. पालखी सोहळा उद्‍घाटन व पूजन अध्यक्ष बबेराव शंकरराव जाधव यांच्या हस्ते आहे. पूजन पद्मश्री. डॉ. डी. वाय. पाटील व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी ८ वाजता महाप्रसाद वितरण सोहळा होणार आहे. या वेळी पालखीसमोर शिवालय भजनी मंडळ यांचे भजन, धनगरी ढोल, झांजपथक व आतिषबाजी करण्यात येईल, अशी माहिती मंदिराचे सेक्रेटरी अशोक मेस्त्री व विलास गौड यांनी दिली. या वेळी अध्यक्ष बबेराव जाधव, उपाध्यक्ष सत्यजित जाधव, दीपक जाधव, अरुण आवटे, शिवाजी जाधव, अजित जाधव, किशोर भोसले, उदय कारंजकर, केशव पोवार, अजित आयरेकर, गणेश भोसले, अजय भोसले यांची उपस्थिती होती.