
कंदलगाव..सुभाष नगर रिंग रोड चौकात पाणी गळती
04583
सुभाषनगर रिंगरोड चौकात गळती
हजारो लिटर पाणी वाया; दुरुस्तीची मागणी
कंदलगाव ता. २७ ः कोल्हापूर महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी पाण्याचा अपव्यय होऊ नये तसेच नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे वारंवार आवाहन केले जात आहे. दुसरीकडे सुभाषनगर रिंग रोड रस्त्यावरील शेंडापार्क परिसरात जलवाहिनीला दोन दिवसांपासून गळती लागली आहे. आत्तापर्यंत हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे.
वीज वितरण तांत्रिक बाब, गळतीसह अनेक आडचणींमुळे शहर व परिसरातील पाणी वितरण यंत्रणा विस्कळीत झाली आहे. अशा वेळी परिसरात लागलेल्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. रिंग रोड चौकात गळती लागून वाया जाणारे पाणी मोठ्या प्रमाणावर आहे . गळतीचे पाणी चरीतून वाहत रस्त्यावर आले आहे. लवकरात लवकर या ठिकाणची गळती थांबवून पाण्याचा अपव्यय थांबविण्याची मागणी होत आहे.
कोट ..
उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर असून कडक उन्हाळा जाणवत आहे. यामुळे शहरासह उपनगरात काही भागांत बहुतांशी ठिकाणी पाणीटंचाईचे चित्र आहे. मात्र, दोन दिवसांपासून सुभाषनगर रिंगरोड चौकात गळती लागून पाणी वाया जात असल्याने गळती थांबविणे गरजेचे आहे.
- संतोष बिसूरे