कोल्हापूर..२ एप्रिल रोजी बेरोजगार मोर्चाच्या वतीने ''बेरोजगारों की संसद .'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर..२ एप्रिल रोजी बेरोजगार मोर्चाच्या वतीने ''बेरोजगारों की संसद .''
कोल्हापूर..२ एप्रिल रोजी बेरोजगार मोर्चाच्या वतीने ''बेरोजगारों की संसद .''

कोल्हापूर..२ एप्रिल रोजी बेरोजगार मोर्चाच्या वतीने ''बेरोजगारों की संसद .''

sakal_logo
By

बेरोजगार मोर्चातर्फे
उद्या ''बेरोजगारों की संसद’
कोल्हापूर ः स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही भारत देश प्रगतीच्या दिशेने कमी आणि अधोगतीच्या दिशेने जास्त वाटचाल करीत करताना दिसत आहे.भारताची ओळख बेरोजगारांचा देश अशी निर्माण झाली आहे. ३५ करोडपेक्षा जास्त युवावर्ग बेरोजगार आहे.
भाजप असो किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या कचखाऊ धोरणामुळे देशात बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. त्या बेरोजगारीला थांबवण्यासाठी कोणत्याच प्रकारची उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे भारतीय रोजगार मोर्चाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांची संसद हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या माध्यमातून देशातील लाखो करोडो किंवा वर्गाचा आवाज जनमानसात पोहोचवला जाईल. सोबतच बेरोजगारांच्या समस्येवर समाधान करण्यासाठी काम केले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य संयोजक किरण कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यक्रम रविवारी (ता. २) दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग हॉलमध्ये ''बेरोजगारों की संसद ''हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती टी. व्ही. नलवडे उपस्थित राहणार आहेत, असे कांबळे यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष स्वप्निल सुभेदार ,राज्य संयोजक अक्षय मांडूकलीकर, जिल्हाध्यक्ष तुषार कौलवकर, संयोजक जुनेद शिकलगार उपस्थित होते.