कोल्हापूर . .कणेरी मठ येथे उद्या सहकार भारती कार्यकारणीची बैठक ..

कोल्हापूर . .कणेरी मठ येथे उद्या सहकार भारती कार्यकारणीची बैठक ..

सहकार भारती प्रदेश कार्यकारणीची
आज कणेरी मठ येथे बैठक

कोल्हापूर, ता. २९ः सहकार भारती, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने प्रदेश कार्यकारिणीची बैठक रविवारी (ता.३०) सकाळी १० वाजता कणेरी मठ येथे होणार आहे. या बैठकीला संपूर्ण महाराष्ट्रातून ३६ जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जुगादे म्हणाले, ‘दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीमध्ये सहकाराच्या सक्षमीकरणाकरिता तसेच सहकार भारतीच्या संघटनात्मक वाढीकरता मंथन आणि चिंतन केले जाणार आहे. संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे कोणत्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे, कोणते नियम पाळले पाहिजेत याविषयी मार्गदर्शन होणार आहे. आगामी काळात सहकार भारतीची कार्यपद्धती कशी राहणार आहे, याबद्दलही चर्चा होणार आहे.
बैठकीच्या पहिल्या सत्रात उदघाटन, नवीन सहकार धोरण, सहकार भारतीकडून अपेक्षा, सहकार सुगंध, कार्यकर्त्यांचा सत्कार, शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिके होणार आहेत. तर दुसऱ्या सत्रात संघटनात्मक सक्षम जिल्हा, सदस्यता अभियान, प्रशिक्षण, मुक्त चिंतन व ठराव, परिचय व समारोप असे कार्यक्रम होणार आहेत .
पत्रकार परिषदेस सहकार संस्था महिला प्रमुख वैशाली आवाडे, जिल्हाध्यक्ष जवाहर छाबडा, संघटन प्रमुख संजय परमणे, जिल्हा महामंत्री धोंडिराम पागडे यांची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com