कोल्हापूर . .जीसीसी - टीबीसी केंद्र पूर्ववत सुरु करणे बाबत विद्यार्थ्यांचा मोर्चा ..

कोल्हापूर . .जीसीसी - टीबीसी केंद्र पूर्ववत सुरु करणे बाबत विद्यार्थ्यांचा मोर्चा ..

Published on

05244
सरवडेतील टायपिंग
परीक्षा केंद्र पूर्ववत ठेवा

जनता दलाचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर, ता. ८ : सरवडे (ता. राधानगरी) येथे दोन-तीन टायपिंग प्रशिक्षण संस्था काम करतात. आगामी परीक्षेसाठी हे केंद्र बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे केंद्र पूर्ववत ठेवावे, अशी मागणी होत आहे.
दुर्गम, डोंगराळ, अतिवृष्टीच्या राधानगरी तालुक्यात सरवडे परिसरात सुमारे दहा ते बारा गावांत जेथे दळणवळणाची सोय नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी सरवडेत दोन-तीन टायपिंग प्रशिक्षण संस्था काम करतात. या संस्थेमधून दरवर्षी ४०० विद्यार्थी २०१५ पासून परीक्षा देऊन नोकरीसाठी बाहेर पाडतात. असे असताना १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी हे केंद्र बंद करून राधानगरी व मुरगूड या ठिकाणी मुलांना परीक्षेसाठी पाठवण्याचा घाट आहे. हे केंद्र पूर्वत सुरू करावे, या मागणीसाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून व परीक्षा परिषदेचे आयुक्त यांना मागणीचे निवेदन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबवणे यांना दिले. निवेदनाचा विचार न झाल्यास १२ जुलैपासून बेमुदत आंदोलन करून परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला. जनता दल (सेक्युलर) चे शिवाजीराव परुळेकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. ऑल इंडिया फेडरेशनचे अभिजीत खोत, जनता दलाचे मधुकर पाटील, रवींद्र जाधव, वसंतराव पाटील, कपिल खराटे, शुभम शिरीहट्टी यांच्यासह परिसरातील विद्यार्थी उपस्थित होते .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.