कोल्हापूर . .उचगाव येथे शेतीशाळा उत्साहात ..

कोल्हापूर . .उचगाव येथे शेतीशाळा उत्साहात ..

B06147
उचगावला शेतीशाळा उत्साहात
कोल्हापूर : कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम २०२३ उत्पादकता वाढीसाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक आणि इतर गळी मूल्य विकास योजनांतर्गत शेतकऱ्यांची शेतीशाळा शिवाजी कदम यांच्या शेतात झाली. शेतीशाळा कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती विकास सोसायटीचे चेअरमन संजय चौगुले यांच्याहस्ते झाले. कृषी विभागातील मंडल कृषी अधिकारी मोहिनी वाळेकर यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. अभिजित कदम, वंदना कदम यांनी, नवनवीन माहितीमुळे शेतीबद्दल आकर्षण निर्माण होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.अजित सौदी, वसगडे कृषी पर्यवेक्षक करवीर-२ संतोष पाटील यांनी एकत्रित शेती योजनेची माहिती दिली. कृषी सहाय्यक प्रदीप रोकडे यांनी खरीप हंगामात कमी कालावधीतील मका पीक लागवडीबाबत मार्गदर्शन करुन आभार मानले. कृषी विभागातील राहुल पाटील, टी .के. कांबळे, उमा गुरव, रामेश्वरी कांबळे, दीपाली सुतार, नीलम पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भूषण कदम, नारायण मनाडे, प्रकाश चौगुले, आनंदा माने, आनंद गजबर, आनंदा मनाडे, वसंत रेडेकर, अमोल निगडे, शिवाजी तोरस्कर, अभिजीत पाटील, सतीश मर्दाने, निवास जाखले, जयश्री कदम, शितल कदम, शुंभागी पाटील आदींसह शेतकरी महिला, शेतकरी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com