कंदलगाव ..जवाहर नगरात कुत्र्यांची दहशत ..  महिला, विद्यार्थ्यात भिती .. डॉग स्कॉट आहे तरी कुठे ? नागरीकातून सवाल . .

कंदलगाव ..जवाहर नगरात कुत्र्यांची दहशत .. महिला, विद्यार्थ्यात भिती .. डॉग स्कॉट आहे तरी कुठे ? नागरीकातून सवाल . .

06664
जवाहरनगरात कुत्र्यांची दहशत
डॉग स्कॉट आहे तरी कुठे ः नागरिकातून सवाल

कंदलगाव; ता. ६ : जवाहरनगर परिसरातील लक्ष्मी वसाहत, सिरत मोहल्ला, दत्त कॉलनी परिसरात कुत्र्यांची टोळकी वाढल्याने त्यांच्या दहशतीने महिला, विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
लक्ष्मी वसाहत मुख्य गल्ली सुमारे १० ते १५ कुत्री एकमेकांच्या मागे लागून जोरजोरात भुंकत असल्याने परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. मुख्य रस्त्यांवर मटण, चिकन विक्रेते असल्याने या कुत्र्यांचा ठिय्या त्याठिकाणी दिवसरात्र असतो. गल्लीतील रिकाने प्लॉट व अनेकांच्या अंगणात ही कुत्री बसलेली असतात. स्थानिकांतून त्यांना हाकलण्याचा प्रयत्न झाल्यास अंगावर धावून जातात. वारंवार अशा घटना घडत असल्याने महापालिकेचे डॉग स्कॉट आहे तरी कुठे; असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चौकट ..
सैरवैर कुत्री अन् दहशत
अगदी पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत सैरवैर कुत्र्यांची गल्लीत पळापळी सुरू असते. अनेकदा कुत्री ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना धडकून पाडतात. अनेकदा इतर कुत्र्यांपासून जीव वाचविण्यासाठी काही कुत्री घरात शिरतात. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

कोट ..
सात - आठ महिन्यांपासून गल्लीत कुत्र्यांची संख्या वाढली आहे. अनेकदा रस्त्यात ठाण मांडून बसतात. गल्लीतून जाताना भीती वाटते. महापालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
- अमर पाटील, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com