कंदलगाव .कोंढाळ्यातील धूराने नागरीक त्रस्त.. कंदलगावातील प्रकार.. तीन कॉलणीत धूराचे लोट..

कंदलगाव .कोंढाळ्यातील धूराने नागरीक त्रस्त.. कंदलगावातील प्रकार.. तीन कॉलणीत धूराचे लोट..

07748

कोंडाळ्याचा धूर; नागरिकांची कुरकुर

कंदलगावातील प्रकार; तीन कॉलन्यांत लोट, श्‍वसनाचा त्रास

सकाळ वृत्तसेवा

कंदलगाव, ता. ९ : कंदलगाव ग्रामपंचायतीकडून वाडीचा माळ येथील खड्डयात गावातील कचरा टाकण्यात येतो. हा कचरा पेटविल्याने गावातील अनेकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. या धुरामुळे लहान मुलांना व ज्येष्ठांना श्वसनाचा त्रास होत असल्याने ग्रामपंचायतीविषयी नाराजी व्यक्त होत आहे.
येथील पृथ्वीराज नगर, गणेश गल्ली, पतसंस्था परिसरासह तालीम संकुल परिसरात या धुराचे लोट पसरत आहेत. पंधरा दिवसांतील ही तिसरी घटना असून स्थानिकांनी वारंवार माहिती देऊनही यावर उपाययोजना होत नसल्याने स्थानिक महिला व नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. शेजारीच तालीम संकुल असल्याने येथे पन्नास लहान मुले तालीम सरावासाठी असतात. त्यांनाही धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.

चौकट.
धुराचे लोट कॉलनीत..
ग्रामपंचायतीद्वारे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे ठिकाण उंचीवर असल्याने यातील धुराचे काळे लोट वाऱ्यामुळे परिसरात पसरत आहेत. हा कोंडाळा मोठा असल्याने यातून बाहेर पडणारा धूर तितक्याच प्रमाणावर आहे. धुराच्या लोटाने कॉलनीतील घरे भरली आहेत.

चौकट.
भरदुपारी धुराचे लोट..
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळाही सकाळी असते. त्यामुळे दुपारी लहान मुले घरीच असतात. उन्हाच्या कडाक्याने कोणीही बाहेर पडत नाहीत. त्यात धुराचा त्रास सहन करावा लागतो. दुपारी वारा शांत असल्याने धूर कॉलनीत घुटमळत असतो.

कोट.
पंधरा दिवसांपासून हा प्रकार सुरू असून घरातील लहान मुलांना धुराचा त्रास होत आहे. ग्रामपंचायत सदस्यांना सांगूनही उपाय होत नाही. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचे आरोग्य बिघडत आहे.
- गणेश हिंदळे, नागरिक

कचरा कोंडाळा पेटल्याची माहिती मिळताच पाण्याचा टँकर पाठविला होता. पुन्हा असा प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेऊ.
- भारत सातपुते, ग्रामविकास अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com