कोल्हापूर .आता तरी डोळे उघडणार का? संभाजीनगर रस्त्यावरच्या काँक्रीट मिक्सर मशिनचा धोका कायम..

कोल्हापूर .आता तरी डोळे उघडणार का? संभाजीनगर रस्त्यावरच्या काँक्रीट मिक्सर मशिनचा धोका कायम..

07763

रस्त्यावरील मिक्सरचा धोका कायम

संभाजीनगर मार्गावरील चित्र; ‘अतिक्रमण, शहर वाहतूक’च्या दुर्लक्षाचा तरुण बळी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १२ : संभाजीनगर, कळंबा रस्त्यावर अतिक्रमण करून काँक्रीट मिक्सर लावल्यामुळे मुख्य रस्त्यावर मशीनला धडकून रामानंदनगर येथील दत्तात्रय पवार या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. असेच गंभीर अपघात या रस्त्यावर अनेक वर्षांपासून होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे रस्त्यावरील अडथळे. यामध्ये काही अपघात किरकोळ स्वरूपाचे असले तरी या रस्त्यावर झालेले अतिक्रमण हा चर्चेचा विषय आहे.

शहरासह पाचगाव, कळंबा या उपनगरांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिणामी या रस्त्यावर तितक्याच प्रमाणावर वाहतूक वाढली आहे. संभाजीनगर येथील काही बांधकाम व्यवसायिकांनी आपले काँक्रीट मिक्सर मशिन ट्रॅक्टर ट्रॉलीसह मुख्य रस्त्यावर पार्किंग केल्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. कोल्हापूर ते पाचगाव, कळंबा व गारगोटी तसेच इतर गावांना जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने रस्त्याच्या दुतर्फा लावलेली मिक्सर व ट्रॅक्टर यांसारख्या वाहनांमुळे मार्ग धोकादायक बनला आहे. या धोकादायक मिक्सर मशिन व अतिक्रमणाविरोधात कोणतेही तक्रार होत नसल्याने कारवाई होत नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचा धोका कायम राहिला आहे.
रस्त्यावर लावलेल्या वाहनांना रिप्लेक्टर नसल्याने रात्री ही वाहने दिसून येत नाहीत. संभाजीनगर चौकापासून अगदी आयटीआय चौकापर्यंत एकापाठोपाठ एक अशी सुमारे ३० ते ३५ वाहने लावून निम्मा रस्ता व्यापलेला असतो. ही वाहने रस्त्यावरून हटवल्यास रस्ता रिकामा होऊन अपघात आणि वाहतूक कोंडी होणार नाही.

चौकट.
जुन्या मशिनरी ट्रॅक्टरना रिप्लेक्टरविना
मुळातच संभाजीनगर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने एसटी, बस, ट्रकसह अवजड वाहनांची ये-जा नेहमीच असते. रात्री या रस्त्यावर जुन्या मिक्सर मशीन, ट्रॅक्टर ट्रॉलीच्या एकामागे एक रांगा लावलेल्या असतात. ही वाहने अनेक वर्षे जुने असल्याने त्यांना रिफ्लेक्टरही लावलेला नसतो. रात्री प्रवास करताना समोरील वाहनाच्या उजेडात ही वाहने दिसत नाहीत त्यामुळे अपघात घडतात.

कारवाई का होत नाही?
शहरात दररोज पार्किंगबाबत शेकडे वाहनावर दंडात्मक कारवाई करून मोठ्या प्रमाणावर महसूल गोळा केला जातो. मात्र या संभाजीनगर चौकात वाहतूक पोलिस असूनही त्यांच्याकडून कारवाई होत नाही; याबाबत वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली.

वाहतूक शाखेचे दुर्लक्ष
शहरातील रस्त्यावर चुकून जरी नो पार्किंग किंवा रस्त्यावर वाहन पार्क केल्यास त्यावर तत्काळ कारवाई होते. दंडही केला जातो. मात्र याच वाहतूक शाखेला संभाजीनगर मुख्य रस्त्यावरील लावलेले कॉक्रीट मिक्सर, ट्रॅक्टर,ट्रॉली दिसत असूनही त्याच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते, असे प्रवासी वर्गातून बोलण्यात येते.

कोट.
रस्त्यावरील अडथळ्याने माझ्या एकुलत्या एका मुलाचा बळी घेतला. त्याला कोण जबाबदार? असे अपघात या ठिकाणी रोजच होतात. संभाजीनगर चौकात पुन्हा अपघात घडू नये; यासाठी उपाययोजना कराव्यात. आम्हाला न्याय द्यावा.
- लता पोवा, रामानंदनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com