कंदलगाव.जोर्तिलिंग कॉलनी कॉर्नरवरील खड्डा धोकादायक.. अपघाताची शक्यता..

कंदलगाव.जोर्तिलिंग कॉलनी कॉर्नरवरील खड्डा धोकादायक.. अपघाताची शक्यता..

07792

जोतिर्लिंग कॉलनी कॉर्नरवरील
खड्डा धोकादायक; अपघाताची शक्यता

कंदलगाव, ता. १५ : शहरातून पाचगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जोतिर्लिंग कॉलनी कॉर्नरवर असणाऱ्या खड्डयांमुळे अपघाताची शक्यता आहे. हा खड्डा व्यवस्थित भरून घ्यावा, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.
निर्मिती कॉर्नर ओढ्यापासून पाचगावकडे जाताना जोतिर्लिंग कॉलनी अजिंक्य मित्र मंडळाच्या शेजारी हा खड्डा असून तीन महिन्यांपासून हा खड्डा ‘जैसे थे’ स्थितीत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. मुख्य रस्त्यालगत असणारा हा खड्डा गटारीशेजारील गळतीचा असून या खड्डयात गटारीचे सांडपाणी मिसळण्याची शक्यता आहे. तसेच खड्डयाजवळून वाहतूक सुरू असल्याने अपघाताचा धोका आहे.

कोट.
अजिंक्य मित्र मंडळाजवळील हा खड्डा गळतीसाठी काढला होता. गळती काढली; मात्र कर्मचाऱ्यांनी खड्डाच अपुरा भरला. सध्या या खड्डयामुळे अपघाताचा धोका आहे.
- अमित आळवेकर, स्थानिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com