कंदलगाव .गांधीनगर प्रादेशिक योजनेला सक्षम अधिकाऱ्याची गरज.. योजनेच काम महिन्यापासून बंद.. मुख्य अधिकाऱ्यांची एकदाही क्षेत्रीय भेट नाही..

कंदलगाव .गांधीनगर प्रादेशिक योजनेला सक्षम अधिकाऱ्याची गरज.. योजनेच काम महिन्यापासून बंद.. मुख्य अधिकाऱ्यांची एकदाही क्षेत्रीय भेट नाही..

07794, 07795

गांधीनगर प्रादेशिक योजना रखडली
काम महिन्यापासून बंद; मुख्य अधिकाऱ्यांची भेटच नाही

सकाळ वृत्तसेवा

कंदलगाव, ता. १६ : गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम एक महिन्यापासून रखडले आहे. त्यामुळे पाचगाव, कंदलगावसह मोरेवाडी भागातून नाराजी व्यक्त होत आहे.
तब्बल ३४३ कोटी ६८ लाख रुपयांच्या योजनेचे काम हैदराबाद येथील कंपनी करीत आहे. मात्र काम सुरू झाल्यापासून आजअखेर एकाही अधिकाऱ्याने क्षेत्रीय भेट दिलेली नसल्याने कामावर नेमके कोणाचे लक्ष आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
काम सुरू होऊन दीड वर्ष पूर्ण होत आहे. आतापर्यंत केवळ ४० टक्के काम झाले आहे. तेरा गावांत पाण्याच्या टाकी बांधण्यासाठी आणि पाइपलाइन टाकण्यासाठीचे काम अर्धवट सोडल्याने महिन्यापासून काम बंद आहे. यामुळे कामासाठीचे खड्डे धोकादायक बनले आहेत. जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत २०५४ पर्यंतच्या लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल, अशी योजना मंजूर आहे. यासाठी माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी पाठपुरावा केला होता. दरम्यान,योजनेचे काम नोव्हेंबर २०२२ पासून ठेकेदार कंपनी करीत आहे. खडीच्या गणपती व मूळ सोसायटीजवळ पाचगावसाठी टाकी बांधण्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. मोरेवाडीसाठी पाण्याच्या टाकीचे कामही पन्नास टक्के पूर्ण होऊन थांबले आहे. अशाच प्रकारे पाचगाव, मोरेवाडी, कळंबा अशा तेरा गावांत पाण्याची टाकी, पाइपलाइनसाठी पावसाळ्यापूर्वी खोदाई केली आहे; पण तिथे सध्या कोणतेही काम सुरू झालेले नाही. अपेक्षित गतीने काम होत नसल्याने पुरेशा प्रमाणात आणि स्वच्छ पाणी मिळण्यास विलंब होणार, हे निश्चित आहे.
अस्तित्वात असलेल्या पाणी योजनेला प्रचंड गळती असल्याने पाचगाव, मोरेवाडीसह सर्व भागांत समान पाणीपुरवठा होत नसल्याच्या पाणी टंचाईच्या तक्रारी आहेत. परिणामी, नवीन पाणी योजना शक्य तितकी लवकर पूर्ण व्हावी, यासाठी तेरा गावांचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ठेकेदार कंपनीकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

चौकट.
पुणे, कऱ्हाडमधून लक्ष
संबंधित योजनेसाठी पुणे येथील मुख्य अभियंता व कऱ्हाड येथील कार्यकारी अभियंता योजनेचे काम पाहत आहेत. मात्र दोन्ही अधिकारी कामावर प्रत्यक्ष भेटीसाठी येत नसल्याने या योजनेसाठी सक्षम अधिकाऱ्याची गरज असल्याचे ठरत आहे.

चौकट.
दृष्टिक्षेपातील योजना..
एकूण खर्च :३४३ कोटी ६८ लाख ६१ हजार
पाण्याचा स्रोत : दूधगंगा नदी
प्रशासकीय मंजुरी : १७ जून २०२२
काम कार्यारंभ : ७ नोव्हेंबर २०२२
काम पूर्ण करण्याचा कालावधी : २७ महिने

योजनेतील गावे :
गांधीनगर, उचगाव, पाचगाव, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, कणेरी, गडमुडशिंगी, सरनोबतवाडी, वळिवडे, मोरेवाडी, कंदलगाव, कळंबे तर्फ ठाणे, न्यू वाडदे आदी.


कोट.
महिन्याभरापासून ठेकेदार कंपनीकडून काम बंद आहे. सध्या अनेक ठिकाणी काम अर्धवट स्थितीत आहे. अधिकारी, ठेकेदार गायब आहेत. तेरा गावांतील ग्रामस्थांना मुबलक, स्वच्छ पाणी मिळण्यासाठी गतीने काम करून योजना पूर्ण करावी.
- अनिल सुतार, विलास कांबळे, सदस्य, समाजवेध दक्षता फाउंडेशन, कंदलगाव

कोट.
दोन दिवसांपूर्वी आपण जॅकवेल कामाच्या कॉंक्रिटसाठी हजर होतो. सर्व ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन बंद कामाची पाहणी करून आढावा घेऊ.
- बी. डी. वाईकर, कार्यकारी अभियंता, मजिप्रा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com