केआयटीने ‘टाटा टेक्नोलॉजीच्या ‘रेडी इंजिनियर’मध्ये पटकावले शीर्षस्थ स्थान

केआयटीने ‘टाटा टेक्नोलॉजीच्या ‘रेडी इंजिनियर’मध्ये पटकावले शीर्षस्थ स्थान

07799
कंदलगाव : ‘केआयटी’च्या १३७ विद्यार्थ्यांनी टाटा टेक्नोलॉजीचा ‘रेडी इंजिनियर’चा कौशल्य विकास अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. सोबत संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, डॉ. उदय भापकर, डॉ. अमित सरकार, प्रा. संदेश सांगळे, आदी.

‘रेडी इंजिनियर’मध्ये केआयटी शीर्षस्थ
राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता यादीत पहिल्या १० विद्यार्थ्यांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. १६ : राष्ट्रीय स्तरावरील टाटा टेक्नोलॉजीच्या पुढाकाराने सुरू झालेल्या रेडी इंजिनिअर या तांत्रिक प्रशिक्षण उपक्रमात देशपातळीवर ‘केआयटी’चा झेंडा पुन्हा एकदा अग्रस्थानी राहिला. देशातील शासकीय, मान्यवर खासगी महाविद्यालयांना मागे टाकत ‘केआयटी’ने हे निर्विवाद यश संपादित केले. टाटा टेक्नॉलॉजीने घोषित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या १० जणांच्या यादीत ‘केआयटी’च्या १० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
टाटा टेक्नॉलॉजीने देशातील काही महाविद्यालयांना निवडून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना काळानुरूप विकसित तांत्रिक कौशल्य शिकवण्यासाठी ‘रेडी इंजिनिअर’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. महाविद्यालयाच्या तृतीय वर्षातच त्यांना प्रत्यक्ष क्लासरूम व इंडस्ट्रीयल प्रोजेक्टमधून जास्तीत जास्त प्रॅक्टिकल ज्ञान देण्याचा रेडी इंजिनिअरने हा अभ्यासक्रम तयार केला आहे. ‘रेडी इंजिनिअर’च्या प्रशिक्षणातून उद्योग जगत व शैक्षणिक संस्था यांच्यातील दुवा सांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. आयजीईटीआयटी या ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून त्याच महाविद्यालयातील प्राध्यापकांना प्रथम टाटा टेक्नॉलॉजीजतर्फे प्रशिक्षित केले जाते.
विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूच्या वेळी अशा या उपक्रमाचा लाभ होतो. या प्रशिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढतो, अशा भावना ‘रेडी इंजिनिअर’ उपक्रमाचे समन्वयक प्रा. संदेश सांगळे यांनी व्यक्त केल्या. केआयटीत नियमित वर्ग संपल्यानंतर रेडी इंजिनिअरचे उपक्रम राबविले जातात, असे मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. उदय भापकर यांनी सांगितले.
-----------------
07797
कोट
मौल्यवान ज्ञान देण्यासाठी मी प्रथम टाटा टेक्नॉलॉजी आणि महाविद्यालयाचे आभार मानतो. यातून सैद्धांतिक ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यातील अंतर भरून काढण्यास मदत होते आहे. हा कार्यक्रम मला करिअर घडविण्यासाठी निश्‍चितच मदतगार करेल.
- शंतनू सूर्यवंशी, मेकॅनिकल विभाग, प्रथम क्रमांक विजेता
---------------
07798
डॉ. मोहन वनरोट्टी
‘केआयटी’ सातत्याने विद्यार्थ्यांना पुस्तकी अभ्यासक्रमासोबत प्रॅक्टिकल ज्ञान देण्यासाठी प्रयत्नशील असते. इनप्लांट ट्रेनिंग, पी. बी. एल., मिनी प्रोजेक्ट, मेजर प्रोजेक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा संबंध इंडस्ट्रीज बरोबर यावा हा हेतू असतो. उपक्रमाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढतोच तसेच लाईव्ह प्रश्‍नांवर काम करायची संधी मिळते.
- डॉ. मोहन वनरोट्टी, संचालक, केआयटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com