कंदलगाव .शेंडापार्क तलावाचे संवर्धन व्हावे.. कृषी विभाग,लोकप्रतिनिधींचा पुढाकार महत्वाचा..

कंदलगाव .शेंडापार्क तलावाचे संवर्धन व्हावे.. कृषी विभाग,लोकप्रतिनिधींचा पुढाकार महत्वाचा..

07961, 7960

शेंडापार्क तलावाचे संवर्धन व्हावे
कृषी विभाग, लोकप्रतिनिधींचा पुढाकार महत्त्वाचा.

सकाळ वृत्तसेवा

कंदलगाव, ता. १० : उजाड माळावर वृक्षसंपदा व कृषी विभागाच्या नावीन्यपूर्ण शेती संशोधनासाठी शेंडापार्क परिसराची पाण्याबाबतची स्वयंपूर्णता वाढवी; या उद्देशाने येथील जुन्या व दुर्लक्षित तलावाचे संवर्धन गरजेचे आहे. या परिसरातील भौगोलिक व उताराच्या जमिनीचा फायदा घेऊन जरगनगरच्या पूर्वेस असणाऱ्या जुन्या तलावातील गाळ काढून त्याची साठवण करण्याची क्षमता वाढवल्यास या परिसरात कधीही पाण्याची कमतरता भासणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

१९६७ च्या काळात स्थानिक शेंडापार्क प्रशासनाच्या मदतीने कृषी संशोधन विभागाने येथील रिकाम्या जागेत वृक्षारोपण करून पश्चिम बाजूच्या उताराचा उपयोग करून या ठिकाणी शेजमजूर व बैलगाडीच्या साहाय्याने मोठा बंधारा घालून तलाव तयार केला होता. या तलावात पहिल्याच वर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने त्यातील पाण्याचा उपयोग परिसरातील शेती संशोधनासाठी व्हावा या उद्देशाने तलावातील पाण्याचा सायफन पद्धतीने उपयोग करून परिसरातील शेती संशोधनासाठी वापरले होते. काळाच्या ओघात नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने इंजिन व कृषी पंपाचा वापर होत गेला अन् या तलावाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे २००५ पासून तलावाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने सध्या तलावाचे रूपांतर डबक्यात झाले आहे.
जमिनीचा उतार आणि पाणी साठवण क्षमता या दोन्हींचा विचार केला तर या तलावाचे संवर्धन झाल्यास संपूर्ण शेंडा पार्क परिसर व कृषी विभागाला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा यामध्ये होईल. त्यामुळे तलावाच्या संवर्धनासाठी कृषी विभाग, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा.

चौकट.
सामाजिकता जोपासत पाठपुरावा
भारतीय सैन्यदलातून निवृत्त झालेले शंकर सनगर व राहुल चौधरी या दोघांचा तलावाचे पुनरुज्जीवन व संवर्धन व्हावे यासाठी नेहमी प्रयत्न असतो. सहा महिन्यांपासून त्यांचे सोशल मीडियातून तलाव संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कोट.
कोल्हापूरची पूर्वी ‘तळ्यांचे शहर’ अशी ओळख होती. काळाच्या ओघात बहुतांश तळी नष्ट झाली आहेत. जी तळी शिल्लक आहेत; तीही मरणावस्थेत आहेत. यापैकीच शेंडापार्क तलाव आहे. जो गाळाने आणि तणवर्गीय पाणवनस्पतींनी भरला आहे. भविष्यात पाणी टंचाईचे संकट लक्षात घेऊन प्रशासनाने तळे पुर्णजिवीत पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. यासाठी कृषी विभाग आणि मनपा प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी.
- मधूकर बाचूळकर, वनस्पतीतज्ज्ञ.

कंदलगाव ः शेंडापार्क येथील तलावाची दुर्लक्षामुळे झालेली दुरवस्था.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com