कंदलगाव .वीज वितरण विभागाची अशी ही सामाजिक बांधिलकी .. आई बाबांचे छत्र हरविलेल्या मुलींना शैक्षणिक मदत..

कंदलगाव .वीज वितरण विभागाची अशी ही सामाजिक बांधिलकी .. आई बाबांचे छत्र हरविलेल्या मुलींना शैक्षणिक मदत..

07963
आई-बाबांचे छत्र हरविलेल्या मुलींना मदत
वीज वितरणची बांधिलकी; वीजजोडणीसह शैक्षणिक साहित्यही

सकाळ वृत्तसेवा

कंदलगाव, ता. ८ : जवाहरनगर बिजली चौकातील मानसी गोरख कटके या दहावीच्या विद्यार्थिनीला शेंडा पार्क महावितरण शाखा कार्यालयातर्फे पुस्तके, वह्या व शैक्षणिक साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मानसी जवाहर हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. तिला लहान बहीण असून ती वीर कक्कया शाळेत ७ वीच्या वर्गात शिकत आहे. तिच्या आई-वडिलांचे अकाली निधन झाले असून तिची आजी दिवसभर काबाडकष्ट करुन दोन्ही नातींना सांभाळून कुटुंबाचा गाडा ओढत आहे. कटके यांच्या घरी नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी शेंडापार्क शाखा कार्यालयाचे शाखाधिकारी रवींद्र खोत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, कटके कुटुंबीय हलाखीत जगत असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांतर्फे मानसीला मदत केली. वर्षभरात सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही दिले.
याप्रसंगी प्रेमानंद मौर्य, लक्ष्मण गुरव, सुनील माळी, अझहर शेख, राजू पाटील हे कर्मचारी उपस्थित होते.

चौकट..
कोल्हापूरची प्रेरणा
कोल्हापुरात काय नाही, हा प्रश्न नेहमीच कानावर पडतो. याचाच अर्थ जगात जे नाही ते कोल्हापुरात आहे. याची प्रचिती नेहमीच आम्हाला येऊन दानत हा गुण आमच्यात आल्याचेही अनेकजण बोलतात. तेच शब्द आठवून ही वृत्ती आमच्यातही रुजत असल्याची भावना प्रेमानंद मौर्य यांनी व्यक्त केली.

कोट.
जवाहरनगर परिसरात वीज कनेक्शनबाबत गेलो असता त्यांची परिस्थिती हलाखीची दिसली. त्यामुळे सर्वांनी त्यांना वीज कनेक्शन व वर्षभर लागणारे शौक्षणिक साहित्य दिले.
- रवींद्र खोत, शाखाधिकारी, शेंडापार्क विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com