कंदलगाव .जरगनगर परिसरातील रस्ता विद्यार्थ्यांसाठी बिकट.. पालकांची कसरत.. योगेश्वरी कॉलनीतून रस्ता न केल्यास आंदोलनाचा इशारा ..

कंदलगाव .जरगनगर परिसरातील रस्ता विद्यार्थ्यांसाठी बिकट.. पालकांची कसरत.. योगेश्वरी कॉलनीतून रस्ता न केल्यास आंदोलनाचा इशारा ..

07971, 07972

जरगनगरात शिक्षणाची ‘वाट’ बिकट
रस्त्याअभावी विद्यार्थ्यांची कसरत; पालकांचा आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

कंदलगाव, ता. ११ : सात वर्षापासून महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर शाळेचा नावलैकिक वाढत आहे. येथे दर्जेदार शिक्षणामुळे पटसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, पाचगाव पश्चिम भाग व रायगड कॉलनी परिसरातून योगेश्वरी कॉलनीतून या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांची रस्त्याअभावी कसरत सुरू आहे.
शाळेकडे येणारा रस्ता खूपच खराब झाला असल्याने शाळेला येणारी लहान मुले व त्या मुलांना सोडायला येणारे पालक तसेच वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांची अक्षरशः कसरत होते. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल होतो. त्या चिखलामध्ये वाहने घसरून पडतात. तसेच रस्त्यावरून चालताही येत नाही. यामध्ये रायगड कॉलनी, पाचगाव परिसरातील पश्चिम कॉलन्या तसेच जोतिर्लिंग नगर, योगेश्वरी कॉलनी, जगतापनगर व कळंबा, संभाजीनगर परिसरातील हजारो विद्यार्थी या रस्त्यावरून शाळेला येतात. या परिसरातील मुलांना शाळेला यायची ती एकच वाट असल्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध ज्येष्ठांपर्यंत तिथून ये-जा करत असतात. याआधी त्या रस्त्यावरून जाताना वाहने घसरून कितीतरी विद्यार्थी, पालक जखमी झाले आहेत. त्यामुळे रस्ता दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी होत आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्याने याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, महापालिका या विभागांनी दुर्लक्ष केले आहे.

चौकट
भटक्या कुत्र्यांचा हल्ला
शाळेला येताना व शाळेतून जाताना मुलांना ही कुत्री चावतात. काही दिवसांपूर्वी अनेक शाळकरी मुलांना भटक्या कुत्र्यांच्या जमावाने चावून जखमी केले होते. अनेकदा या कुत्र्यांकडून अचानक हल्ले होत असतात. त्यामुळे त्या कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित करावा.

चौकट.
यापूर्वीही आंदोलन..
परिसरातील रस्त्यांची अत्यंत अवस्था बिकट आहे. त्यामुळे यापूर्वीही येथील उपनगर कृती समिती व यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने ‘विद्यार्थ्यांना रस्ता द्या’ याविषयी आंदोलन झाले आहे. दोन आठवड्यांत रस्त्याविषयी योग्य तो निर्णय झाला नाही तर कृती समिती व पालकांतून आंदोलनाचा इशारा राहुल चौधरी, शीतल नलवडे, निवास भोसले, बाळासाहेब देसाई, चंद्रकांत कांडेकरी, लखन काझी, सविता संकपाळ, नाना सावंत यांनी दिला.

कोट.
07970
कॉलनीचा रस्ता उताराचा असल्याने गटारीचे पाणी पूर्णपणे त्या रस्त्याच्या पायथ्यावरून वाहत असते. नेमका रस्ता आहे काय गटर आहे, हे समजत नाही. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची खूपच तारांबळ होते. शाळेचा परिसर असल्याने भटकी कुत्र्यांचाही त्रास होत आहे.
-कीर्ती पालनकर, पालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com