कोल्हापूर .महापालिका,नगरपरिषद,नगरपंचायत कर्मचारी काम बंद आंदोलनाच्या तयारीत..

कोल्हापूर .महापालिका,नगरपरिषद,नगरपंचायत कर्मचारी काम बंद आंदोलनाच्या तयारीत..

महापालिका, नगरपंचायत कर्मचऱ्यांचे
६ ऑगस्‍टपासून काम बंद आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : महाराष्ट्र राज्य महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी ६ ऑगस्‍टपासून बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. ए. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या आयुक्त मुख्याधिकारी ६ जूनला काम बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याची नोटीस दिली होती. त्यानंतर आपल्या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर १८ जूनला धरणे आंदोलन आयोजित करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत काम बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याची नोटीस ही दिली आहे.
आंदोलने होत असताना देखील महाराष्ट्र सरकार या कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नाकडे गांभीर्याने बघायला तयार नाही. त्यामुळे ९ जुलैला विभागीय आयुक्त, पुणे कार्यालयांवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या काम बंद आंदोलनात सहभागी होण्यापूर्वीचा अखेरचा इशारा दिला जाणार आहे.’’ कार्याध्यक्ष धनंजय पळसुले, सहसचिव दऱ्याप्पा परीट, सूर्याजी भोपळे, जी. डी. खान, शंकर अगसर उपस्थित होते.
----------------
चौकट
संघटनेच्या मागण्या अशा
राज्यातील नगरपंचायतीमधील ग्रामपंचायतकालीन कायम कर्मचाऱ्यांचे सात वर्षे प्रलंबित असणारे समावेशन तात्काळ करण्यात यावे, राज्य शासकीय सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांचे सेवा निवृत्तनंतरचे सर्व लाभ, वेतन व पेन्शन कोषागारमधून करण्यात यावे यांसह इतर नऊ मागण्या संघटनेच्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com