कंदलगाव .महापालिका पाणी गळतीचा खड्डा,हद्द बांधकाम विभागाची,रोष ग्रामपचायतींवर आणि त्रास नागरीकांना.. आर.के.नगर चौकातील स्थिती..

कंदलगाव .महापालिका पाणी गळतीचा खड्डा,हद्द बांधकाम विभागाची,रोष ग्रामपचायतींवर आणि त्रास नागरीकांना.. आर.के.नगर चौकातील स्थिती..

08114

गळतीचा खड्डा, हद्द ‘बांधकाम’ची,
रोष मात्र ग्रामपंचायतींवर

आर. के. नगर चौकातील स्थिती

कंदलगाव, ता. ४ : मुख्य चौक, वर्दळीचे ठिकाण, नागरिकांची गर्दी अशी स्थिती असणाऱ्या आर. के. नगर मुख्य चौकात दीड वर्षापासून गळतीचा खड्डा वाहनधारकांना धोकादायक ठरत आहे.
आर. के. नगर मुख्य चौकात दीड वर्षापूर्वी गळती व पाईपलाईन स्वच्छतेसाठी महापालिका पाणीपुरवठा विभागाने खड्डा घेऊन गळती काढली आणि ही हद्द बांधकाम विभागाची असल्याने रस्त्याचे काम सुरू होणार म्हणून खड्डा तसाच ठेवून गेले. या खड्डयामुळे चौकात वाहतूक कोंडी, नागरिकांची वर्दळ, अवजड वाहने यामुळे अनेकदा किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात होतात. त्याचा रोष मात्र ग्रामपंचायतीवर येत आहे. याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना होत असल्याने ‘पाणीपुरवठा गळतीचा खड्डा, हद्द बांधकाम विभागाची, रोष ग्रामपचायतींवर आणि त्रास नागरिकांना'' अशी चर्चा होत आहे.
या तीन विभागांच्या दुर्लक्षाने दीड वर्षापासून या चौकातून धोकादायक वाहतूक सुरू आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने खड्डा रुंदावत चालला असून शेजारीच रिक्षा स्टॉप असल्याने प्रवाशांची कसरत होत आहे.

कोट.
महापालिकेची पाणी गळती येथे आहे. पाचगावपासून या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल. या ठिकाणी चेंबर करून प्रवासी व नागरिकांची गैरसोय दूर करू.
- परशुराम नंदीवाले, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

.महापालिकेने गळती काढून खड्डा तसाच ठेवला आहे. हा रस्ता बांधकाम विभागाच्या हद्दीत आहे. रोष मात्र ग्रामपंचायतीवर येत आहे. रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी चेंबर बांधून गैरसोय टाळावी.
-प्रियंका पाटील, सरपंच, पाचगाव.

मुख्य चौकातील हा खड्डा धोकादायक आहे. अनेकदा ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांना कसरत करावी लागते. खड्डा बुजवणे गरजेचे आहे.
- अमर सरनाईक, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com