

शेंडापार्कातील कचरा
महापालिकेने उचलला
कंदलगाव : कामाच्या ठिकाणी जाता जाता कचऱ्याने भरलेली पिशवी रस्त्याच्या कडेला टाकून अनेक जण या भागातून जात असतात. त्यामुळे शेंडा पार्क परिसरात कचऱ्याचे मोठे ढीग असतात. कचऱ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत असल्याने नागरिकांतून हा कचरा उठाव करण्याची मागणी होत होती. महापालिका आरोग्य विभागाकडील आरोग्य निरीक्षक, सहा.आरोग्य निरीक्षक व कर्मचारी यांनी मोहिम राबवून जेसीबीच्या सहाय्याने कचरा उठाव करण्यात आला. यावेळी नागरीकातून समाधान व्यक्त करण्यात आले. शेंडापार्क महापालिकेची हद्द असून हा परिसर वस्तीविरहित आहे. मात्र आर. के. नगर परिसर व प्रवाशांकडून या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो. हा कचरा मात्र महापालिकेला उचलावा लागतो, अशीही खंत कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.