Sun, March 26, 2023

सामुदायिक कालभैरव अष्टक पठण
सामुदायिक कालभैरव अष्टक पठण
Published on : 22 February 2023, 3:13 am
सामुदायिक कालभैरव अष्टक पठण
खोची ः येथील भैरवनाथ मंदिरात एक लाख कालभैरव अष्टक स्तोत्रपठणाचा संकल्प केला आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत सामुदायिकरीत्या पठण सोहळा होईल. याद्वारे ईष्टदेवता आवाहन केले जाणार आहे. भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भैरवनाथ मंदिरात कालभैरवाष्टक स्तोत्रपठण कार्यक्रम यंदा पहिल्यांदाच होत आहे. यात महिला, पुरुष भाविकांकडून सामुदायिक एक लाख स्तोत्र पठण केले जाईल. यासाठी सर्व व्यवस्था मंदिर समितीने केली आहे. परगावच्या भाविकांचीही सोय केली आहे, अशी माहिती पुजारी गुरव गोसावी-डवरी यांच्यातर्फे देण्यात आली.